महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी : प्रा.सारिका ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी : प्रा.सारिका ढोकणे

उंबरे : सचिन शेजुळ     महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर निश्‍चितच महिला सबळीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होण्यास मदत होईल. त्याकरीता म...

उंबरे : सचिन शेजुळ


    महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर निश्‍चितच महिला सबळीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होण्यास मदत होईल. त्याकरीता महिलांनीही घरची जबाबदारी सांभाळत असतानाच आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन ग्लोबल स्कुलच्या प्राचार्या प्रा. सारिका रामकृष्ण ढोकणे यांनी केले.
    उंबरे येथे डॉ. राम ढोकणे फांउडेशन व साईधाम हॉस्पिटल अ‍ॅण्ड टेस्ट ट्युब बेबी सेंटर, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत स्त्री सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत औषध वाटप शिबीराप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदूधर्मप्रचारक आदिनाथ महाराज उंबरेकर हे होते. तर व्यासपीठावर डॉ. स्वप्नील माने, डॉ. सोनाली माने, कासार समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेंद्र उंडे, युवानेते प्रताप पटारे, दीपक ढोकणे, जनार्धन ढोकणे, विलास गरूड, एकनाथ महाराज वाघ, गणेश दुशिंग, लक्ष्मण पटारे उपस्थित होतेे. स्वप्नील माने म्हणाले, आज महिलांचे आरोग्य हा चिंतेचा विषय आहे. महिलांनी स्वतःची काळजी घेताना फळे, हिरव्या भाज्या आहारात घ्याव्यात व वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहन केले.
    राजेंद्र उंडे यांनी डॉ. राम ढोकणे यांनी गावात घेतलेल्या या शिबीराचे कौतूक केले.
छत्रपती प्रतिष्ठाण व शिवसेनेच्या वतीने या शिबीराबद्दल डॉ. राम ढोकणे फाउंडेशनचे गणेश दुशिंग यांचा कैलास आडसुरे यांनी सन्मान केला.  यावेळी 121 महिलांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीरात सहभाग घेतल्याचे समजले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत