उंबरे : लक्ष्मण पटारे गाँव के अंधेरे को एक चिराग काफी है, सौ चिराग जलते है एक चिराग जलानेसे.....! हे ब्रीद घेवून गावातील विकासा...
उंबरे : लक्ष्मण पटारे
गाँव के अंधेरे को एक चिराग काफी है, सौ चिराग जलते है एक चिराग जलानेसे.....! हे ब्रीद घेवून गावातील विकासाचा अंधकार दूर करण्यासाठी एक सुशिक्षीत, सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतीमेचा धेय्यवेडा तरूण गावाकडे वळला असून गावच्या हितासाठी शेकडो तरूण एकत्र येवून त्यांच्यासोबत जोडले जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. निमित्त होते ते एका अविसमरनिय वाढदिवसाचे...!
प्रा. रामकृष्ण ढोकणे असे हे धेय्यवेड्या तरूणाचे नाव. उंबरे गावात जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावात झालं, पुढील शिक्षण बाहेरगावी घ्यावे लागले. जीवनात अनेक चढ-उतार आले. त्यातून ग्लोबल स्कुलची स्थापना केली. राहुरीत आज ग्लोबल स्कुलच्या माध्यमातून शेतकर्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलांनाही शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत. अर्थात याकामी शिक्षण क्षेत्रातील आजच्या या ज्योतीबाला सावित्रीचीही साथ आहेच.
दरम्यानच्या काळात गावापासून बराच काळ दूर राहिल्यानंतरही आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची या शिक्षकाची धडपड आहे. आपण जरी राहुरीत राहत असलो तरी उंबरे हे आपल जन्मगाव आहे, येथे बालपणीच्या आठवणी आहेत. येथील संस्कार आपल्यावर आहेत. त्यामुळे आज आपण जरी संस्था चालक झालो असलो तरी गावाचं काही देण लागतो हे ते विसरलेले नाहीत. त्यामुळेच प्रा. ढोकणे यांनी गावासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मध्यंतरी गाव उन्हाळ्यात पाण्यासाठी कोसनकोस भटंकती करत असताना प्रा. ढोकणे यांनी छत्रपती प्रतिष्ठाणच्या हाकेला साद देत गावात स्वःखर्चाने टँकरने पाणी पुरवठा केल्याचे आजही कुणी विसरलेले नाही. याशिवाय अखंड हरिनाम सप्ताह, गावची यात्रा यातही त्यांनी कधी हात आखडता घेतलेला नाही. गावातील महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीरही त्यांनी मध्यंतरी घेवून महिला भगिणींना आधार दिल्याचे पहायला मिळाले.
एकीकडे गावात अंतर्गत राजकारणातून विकासाला ‘खो’ बसला आहे. गावातील पाणी प्रश्नही रेंगाळलेला आहे, अंतर्गत रस्तेही दुरस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, गावातील स्वच्छता तर संशोधनाचा विषय बनली आहे, गावचे आरोग्य बिघडले आहे, शिक्षणही व्ह्ेंटीलेटरवर आहे, त्यातच गावातील चिमुरडे आकाशाच्या उघड्या छताखाली पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवतानाचे उदासिन चित्र आहे, गावात कुठं सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, पथदिवेही बंद आहेत. कारभारही भ्रष्टाचाराने पोखरला गेला आहे, अशा या काळोखात गावचा तरूणही निद्रावस्थेत असल्याने त्यांना जागविण्यासाठी कुणीतरी चिराग घेवून येईल याकडे अनेकांचे लक्ष होते.
सुदैवाने ती वेळ आली आहे. गावातीलच प्रा. रामकृष्ण ढोकणे यांनी हा चिराग आणण्याचे धाडस दाखवले आहे. गावातील आराध्य दैवत असलेले हनुमान मंदीर परिसरात अनेक दिवसांपासून अंधार होता. सर्वप्रथम हा अंधार दूर करून गावात ‘प्रकाश’ सुरू करू असे मनाशी त्यांनी ठरवले. त्यातून त्यांनी पाच हायमॅक्स दिवे ग्रामस्थांकडे सुपूर्द करून गावामध्ये पहिला चिराग पेटवला आहे. त्यांना आता अपेक्षा आहे की निश्चितच येणार्या काळात शेकडो चिराग पेटून गावात ‘विकासा’चा लखलखाट होईल.
याकामी एक मार्गदर्शक म्हणून हिंदूधर्मप्रचारक आदिनाथ महाराज दुशिंग यांची खंबीर साथ त्यांना मिळाली आहेत, तर छत्रपती प्रतिष्ठाणसह अन्य सामाजिक संघटनांनीही याकामी प्रा. ढोकणे यांच्या या भूमिकेचे स्वागत करून त्यांच्यासोबत आपणही एक चिराग घेवून गावच्या हितासाठी पुढे येण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उंबरे गावात आता प्रकाशमय होताना दिसणार आहे. अर्थात, या अंधाराकडून प्रकाशाकडे सुरू असलेल्या प्रवासात गावातील ज्येष्ठ नेत्यांची साथ असणे गरजेचे आहे हे तितकेच खरे..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत