सचिन शेजुळ, उंबरे महाराष्ट्र ही संतांची पावणभूमि आहे. प्रत्येक जातीमध्ये थोर विभुती संत रुपाने प्रकट होवून भागवत संप्रदाय वाढीस...
महाराष्ट्र ही संतांची पावणभूमि आहे. प्रत्येक जातीमध्ये थोर विभुती संत रुपाने प्रकट होवून भागवत संप्रदाय वाढीस लावण्याचा त्यांच्याकडून तळमळीने प्रयत्न झालेला आहे. यात सुतार समाजातील रघुनाथ महाराज उंबरेकर हे देखील एक महान संत होत.
उंबरे गावचे नाव कसे पडले जिल्हा हा भक्तिमार्गाचे उगमस्थान आहे.भागवत धर्माचा पाया ज्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने घातला तो ग्रंथ याच जिल्ह्याने जगाला दिला आहे. ज्ञानेश्वरांची गुरू परंपराही नाथपंथीयांची आहे. नऊनाथांपैकी अनेक नाथांचे तपस्थान, निवासस्थान याच जिल्हयात आहे. आदिगुरू गोरक्षनाथांचे तपस्थान हे वांबोरी डोंगरावर आहे आणि याच परिसरातील उंबरे हे गाव आहे. ‘उंबर’ म्हणजे ‘औदुंबर’ हे नाथपंथातील पवित्र वृक्ष होय. तेच नाव या गावास लाभले आहे. अशा गावी रघुनाथबाबांचा जन्म होणे हा देखील दैवाचाचं एक ऋणानुबंध आहे.
आदरणीय रघुनाथ बाबांचा जन्म भागवत संपद्रायाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे पवित्र काम निस्पृह हेतूने अहोरात्र करणारे सामान्य माणसांना समजेल अशा सोप्या, रसाळ, वाणीद्वारे कीर्तन रुपी सेवा करणारे एक बालक राहुरी तालुक्यातील उंबरे या केवळ 2000 लोकसंख्या असलेल्या खेड्यात सुतार जातीत जन्माला आले. मिती अश्विन वद्य 4 शके 1843 गुरूवार दि. 20 ऑक्टोबर 1921 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सौ. गीताबाई या मातेच्या पोटी बाबांचा जन्म झाला. वडील मारुतीराव बारवेकर यांनी आपल्या या पुत्राचे नाव रघुनाथ असे ठेवले बाबांची परमार्थाकडे ओढ ह्या घराण्यात गंगाराम बुवा बारवेकर हे थोर पुुरुष होवून गेले. त्यांचे चिरंजीव श्रीपतबुवा बारवेकर तसेच आई, वडील, चुलत भाऊ आणि चुलत आजोबा ह्याचे संस्कार रघुनाथ या बालकावर झाले. बाबांचे शिक्षण अवघे चौथी पर्यंत, त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. सुतारकीचा प्रमुख व्यवसाय होता. दिवसभर कष्ट करून रात्री नित्य नियमाने ग्रंथ वाचन आणि भजन हा त्यांचा कार्यक्रम असे. वयाच्या 7 व्या वर्षापासून त्यांना भजनाचा धंद लागला. वडीलांबरोबर ग्रंथ श्रवण आणि भजन करण्यास ते नित्यनेमाने जात असे. वयाच्या 17 व्या वर्षी श्रीपतबुवांकडून ते मृदृंग वाजविण्यात निष्णात झाले. याच काळात त्यांनी हरिविजय, रामायण, एकनाथी भागवत, भावार्थ पारायण, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचे वाचन केले. पुढे रघुनाथ बाबा हे कोंडू काका यांचे शिष्य झाले. त्यानंतर त्यांची परमार्थिक प्रगती वाढीस लागली. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव रघुनाथ बाबांचे पहिले कीर्तन हे गावातील महादेव मंदीरात झाले. बाबांचा गृहस्थाश्रम ते वृद्धेश्वर प्रवास

उंबरे गावात त्यावेळी परमार्थिक कार्यास एक प्रकारचे उधान आले होते. भजन, नित्य ग्रंथवाचन, हरिकीर्तन, नामसप्ताह, पंढरपूर, आळंदी, देह, पैठण दिंडी, कार्तिक स्नान, इत्यादी कार्यक्रम घडविण्यात बाबांचा मोठा वाटा होता. यावेळी उंबरेत संताची मांदीयाळी असे. त्यात बन्सी महाराज तांबे यांची कीर्तने सतत होत असे. याच काळखंडात रघुनाथ बाबांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. शिंगणापूर येथील लक्ष्मणराव खामकर यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. कालांतराने मातृछत्रास ते पारखे झाले. तुकाराम महराजांचे चरित्र आणि गाथा वाचन यावर त्यांचा विशेष भर होता. त्यामुळे नकळतच दया, क्षमा, शांती, मोह, माया, निष्ठा, प्रेम, भक्ति, वैराग्य, त्याग या गुणांचा बाबांच्या जीवनावरही परिणाम झाला. प्रपंच करून परमार्थ साध्य करून घेण्याची गुरुकिल्ली त्यांना गाथेतून मिळाली. प्रपंचात असताना त्यांना अपत्ये झाली. पंढरीनाथ, विठ्ठल, पांडुरंग ही तीन मुले तर मथुरा आणि यमुना हया दोन मुली जन्माला आल्या.
एकीकडे प्रपंचात असतानाही दुसरीकडे वृद्धेश्वरकडे त्यांचा ओढा वाढतच होता. त्यातून 1956 पासून पहिली दिंडीव्दारे ज्ञानगंगेचा हा ओघ वृद्धेश्वरच्या दिशेने खर्या अर्थाने वाहता झाला. पुढे 1958 मध्ये साष्टांग दंडवत घालीत बाबांनी पंढरपूर यात्रेचे स्वप्न पूर्ण केले. 1959 मध्येही ही परंपरा पुढे चालूच राहिली. त्याचबरोबर कीर्तने, प्रवचने, भजने वाढू लागली. त्याचा चांगला परिणाम गावातील जनसमुदायावरही होवू लागला. पुढे, दुर्दैवाने त्यांचे वडील मारुती बारवेकर हे अनंतात विलीन झाले. त्यानंतर काही कालावधीतच श्रीपतबुवांचाही आधार तुटला आणि बाबा एकटे पडले. त्यांच्या मनात अनेक विचार येवू लागले. प्रपंचासंबधी त्यांचे मन विटत चालले. त्याग व वैराग्य ह्यांची मनाच्या ठिकाणी कालवा कालवी सुरू झाली आणि गृहसौख्यावर लाथ मारण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला.
मिती आषाढ शुद्ध 11 शके 1981 दि. 17 जुुुलै 1959 रोजी आराध्य दैवत श्री आदिनाथ ह्यांच्या साक्षीने त्यांनी गृहत्याग केला. चाळीसगाव येथील ब्रम्हनिष्ठ जनार्दन स्वामी यांच्याकडून त्यांनी विधीपूर्वक संन्यास दिशा घेतली. ही वार्ता चोहोकडे पसरली. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही संन्यास घेतल्याची वार्ता वांबोरीमार्गे उंबरे गावात येवून धडकली. संपूर्ण गावात दुखाचे वातावरण पसरले. यावेळी गावकर्यांनी बाबांना आपल्या गावी परत आणायचे असा संकल्प केला. त्यावेळी मिळेल त्या साधनांनी उंबरेकरांनी वृद्धेश्वरकडे धाव घेतली.वृद्धेश्वरला पोहचल्यानंतर ‘तुम्ही उंबरेेला परत चला, आम्ही तुम्हाला नेण्यासाठी आलो आहोत, आम्ही आता माघारी जाणार नाही, असा पावित्रा घेतला. काही ग्रामस्थांनी हंबरडा फोडत बाबांच्या पायाशी लोळण घेतले. गावकरी ढसाढसा रडताना पाहून उपस्थित भक्तजनही भावूक झाला होता. अखेर, बाबांनी एका अटीवर उंबरे गावात पुन्हा येण्याचे ठरवले. मी पुन्हा उंबरेला येतो पण गृहस्थाश्रम स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर ते उंबरे गावात दाखल झाले. त्यादिवशी गावातील कुणीही अन्न ग्रहण केले नाही. गावातच एका छपरात बाबांची राहण्याची व्यवस्था केली होती. परंत्तु, अल्पावधीतच बाबा तेथून निरोप घेत वांबोरीकडे गेले. 1959 ते 1961 या कालावधीत बाबा वांबोरीत होते. त्यानंतर बाबा वृद्धेश्वरात पोहचले. 22 फेब्रुवारी 1963 रोजी वृद्धेश्वर येथे आश्रम शाळेची कोनशिला बसविण्यात येवून बांधकामास सुरूवात झाली. त्यानंतर बाबांनी अखेरचा श्वासही वृद्धेश्वरातील याच आश्रमात घेतला. बाबांचे सानिध्य लाभलेले भाग्यवान दरम्यानच्या काळात उंबरे येथे बाबांचा 61 वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संतमहंताच्या आगमनाने उंबरे नगरी भावमय बनली होती. स्व. जनार्धन महाराज, लक्ष्मण महाराज उंबरेकर, पांडुरंग माधव ढोकणे, भिकाभाऊ ढोकणे, मुरलीधर उंडे गुरुजी, चंद्रसेन ढोकणे गुरुजी, गंगामामा शेजूळ, भानुदास आडसुरे, भानुदास ढोकणे, गणुभाऊ ढोकणे, जगन्नाथ आडसुरे, दत्तु हरी दुशिंग, रघुनाथ रंगनाथ ढोकणे, त्रिंबक ढोकणे (भाऊजी), बन्सी क्षीरसागर, गुंजाळ भाऊसाहेब आदींनी या उत्सवासाठी समस्त ग्रामस्थांसमवेत परिश्रम घेतले होते. त्यानंतर मोठ्या तपश्चेेर्यनंतर 1984 मध्ये बाबांनी अखरेचा श्वास घेतला.
एकीकडे प्रपंचात असतानाही दुसरीकडे वृद्धेश्वरकडे त्यांचा ओढा वाढतच होता. त्यातून 1956 पासून पहिली दिंडीव्दारे ज्ञानगंगेचा हा ओघ वृद्धेश्वरच्या दिशेने खर्या अर्थाने वाहता झाला. पुढे 1958 मध्ये साष्टांग दंडवत घालीत बाबांनी पंढरपूर यात्रेचे स्वप्न पूर्ण केले. 1959 मध्येही ही परंपरा पुढे चालूच राहिली. त्याचबरोबर कीर्तने, प्रवचने, भजने वाढू लागली. त्याचा चांगला परिणाम गावातील जनसमुदायावरही होवू लागला. पुढे, दुर्दैवाने त्यांचे वडील मारुती बारवेकर हे अनंतात विलीन झाले. त्यानंतर काही कालावधीतच श्रीपतबुवांचाही आधार तुटला आणि बाबा एकटे पडले. त्यांच्या मनात अनेक विचार येवू लागले. प्रपंचासंबधी त्यांचे मन विटत चालले. त्याग व वैराग्य ह्यांची मनाच्या ठिकाणी कालवा कालवी सुरू झाली आणि गृहसौख्यावर लाथ मारण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला.
मिती आषाढ शुद्ध 11 शके 1981 दि. 17 जुुुलै 1959 रोजी आराध्य दैवत श्री आदिनाथ ह्यांच्या साक्षीने त्यांनी गृहत्याग केला. चाळीसगाव येथील ब्रम्हनिष्ठ जनार्दन स्वामी यांच्याकडून त्यांनी विधीपूर्वक संन्यास दिशा घेतली. ही वार्ता चोहोकडे पसरली. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही संन्यास घेतल्याची वार्ता वांबोरीमार्गे उंबरे गावात येवून धडकली. संपूर्ण गावात दुखाचे वातावरण पसरले. यावेळी गावकर्यांनी बाबांना आपल्या गावी परत आणायचे असा संकल्प केला. त्यावेळी मिळेल त्या साधनांनी उंबरेकरांनी वृद्धेश्वरकडे धाव घेतली.वृद्धेश्वरला पोहचल्यानंतर ‘तुम्ही उंबरेेला परत चला, आम्ही तुम्हाला नेण्यासाठी आलो आहोत, आम्ही आता माघारी जाणार नाही, असा पावित्रा घेतला. काही ग्रामस्थांनी हंबरडा फोडत बाबांच्या पायाशी लोळण घेतले. गावकरी ढसाढसा रडताना पाहून उपस्थित भक्तजनही भावूक झाला होता. अखेर, बाबांनी एका अटीवर उंबरे गावात पुन्हा येण्याचे ठरवले. मी पुन्हा उंबरेला येतो पण गृहस्थाश्रम स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर ते उंबरे गावात दाखल झाले. त्यादिवशी गावातील कुणीही अन्न ग्रहण केले नाही. गावातच एका छपरात बाबांची राहण्याची व्यवस्था केली होती. परंत्तु, अल्पावधीतच बाबा तेथून निरोप घेत वांबोरीकडे गेले. 1959 ते 1961 या कालावधीत बाबा वांबोरीत होते. त्यानंतर बाबा वृद्धेश्वरात पोहचले. 22 फेब्रुवारी 1963 रोजी वृद्धेश्वर येथे आश्रम शाळेची कोनशिला बसविण्यात येवून बांधकामास सुरूवात झाली. त्यानंतर बाबांनी अखेरचा श्वासही वृद्धेश्वरातील याच आश्रमात घेतला. बाबांचे सानिध्य लाभलेले भाग्यवान
एकूणच, रघुनाथ बाबांच्या पदस्पर्शाने उंबरे ही भूमि पावण झाली. या गावाला वारकरी परंपरा बाबांनी दिली. आजही ही परंपरा सुरू आहे. बाबांचे वंशज ह.भ.प. पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल महाराज (मिस्तरी), पांडुरग महाराज, लक्ष्मण महाराज तसेच माऊली महाराज बारवेकर हे बाबांच्या मार्गावरून मार्गक्रमण करत आहेत. तसेच गावातील बाळासाहेब महाराज डेंगळे, गोरक्षनाथ महाराज, मच्छिंद्र महाराज, गोविंदबाबा, मच्छिंद्र महाराज पटारे, आदिनाथ महाराज दुशिंग आदींनी हे व्रत पुढे चालूच ठेवले आहे.
यंदा महाराजांची 36 वी पुण्यतिथी साजरी होत आहे. या त्रितपपुर्ती सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा उंबरे गावात एक चैतन्यमय वातावरण तयार झाले आहे. प्रत्येक घरातील सदस्य या सप्ताहासाठी मनोभावे परिश्रम घेताना दिसत आहे. त्यामुळे उंबरे गावात सात दिवस अनेक साधुसंतांची मांदीयाळी पहायला मिळणार आहे. या सप्ताहात दररोज नामांकीत महाराजांची कीर्तने, भजने, प्रवचन होणार आहेत. दररोज सायंकाळी आमटी भाकरीचा महाप्रसादही होणार आहे.
शब्दांकन ः गोरक्षनाथ शेजूळ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत