उंबरे ः सचिन शेजुळ उंबरे येथील हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधत डॉ. रामकृष्ण फांउडेशनने ग्रामस्थांसाठी विविध आजारांवरील आरोग्य ...
उंबरे ः सचिन शेजुळ
उंबरे येथील हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधत डॉ. रामकृष्ण फांउडेशनने ग्रामस्थांसाठी विविध आजारांवरील आरोग्य शिबीरे आयोजित करून एक आगळा वेगळा आदर्श उभा केला आहे. फांउडेशनचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण ढोकणे यांनी सप्ताहस्थळी नेत्र तपासणी, दंत तपासणी, सर्वरोग निदान शिबीर घेवून हरिनामात दंग झालेल्या भाविकांना नामजपाच्या मूलमंत्रा सोबतच नामवंत डॉक्टरांकडून आरोग्याचाही गुरुमंत्र देवू केला आहे.
उंबरे गावात वै. रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. या सप्ताहात नामवंत महाराजांची कीर्तने, प्रवचने होत आहेत. त्यामुळे भाविकांना ही एक मोठी पर्वणीच समजली जाऊ लागली आहे. त्यामुळे दररोज हजारोंचा जनसमुदाय येथे भक्तीरसांचे गोदामृत सेवन करण्यासाठी आवर्जून हजेरी लावताना दिसतो. यामध्ये सकाळपासून ज्ञानेश्वरी पारायण श्रवणासाठीही भाविकांचा मोठी उपस्थिती असते. अशा भक्तीरसात न्हावून निघालेल्या उंबरे गावाने पंढरीचे रूप धारण केले आहे. प्रत्येक घरा-घरात आणि मना-मनात वारकरी सांपद्रायाची पताका फडताना दिसत आहे. अशाप्रकारे भक्तीमय वातावरण तयार झाले असताना त्यात रामकृष्ण फाउंडेशननेही आरोग्य शिबीराची भर टाकून त्रितपपुर्तीचा सोहळ्याचा आनंद आणखी द्विगुणित केला आहे.
डॉ. रामकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण ढोकणे यांनी सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून आरोग्य शिबीराच्या माध्यमातून वारकरी आणि ग्रामस्थांची एकप्रकारे सेवा सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या शिबीरात तब्बल 259 रुग्णांनी याचा लाभ घेतला. तर काल झालेल्या दंत चिकित्सा शिबीरात डॉ. निमसे यांनी 109 रुग्णांची तपासणी केली, तर नेत्र तपासणीत 143 रुग्णांनी या शिबीरात लाभ घेतला.
या शिबीराचे उद्घाटन ह.भ.प आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या हस्ते तर सप्ताह कमेटीचे सर्वेसर्वा गुंजाळ भाऊसाहेब, बन्सीदादा क्षीरसागर, जे.डी.भाऊसाहेब, बाळासाहेब महाराज डेंगळे, पाठक महाराज, अशोक शेजूळ, कैलास आडसुरे, लक्ष्मण पटारे, जगन्नाथ ढोकणे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी रूग्ण नोंदणीचे काम आदिनाथ ढोकणे सर व जनार्धन ढोकणे (मेडीकल) यांनी केले, तर शिबीराचे नियोजन ग्लोबल स्कुलच्या प्राचार्या सौ. ढोकणे, गणेश दुशिंग आदींनी केले. आरोग्य शिबीरासाठी मोठी गर्दी उसळली होती.
दरम्यान, यावेळी डॉ. ढोकणे दाम्पत्याच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळताना ग्रामस्थांना सप्ताहातून यशस्वी जीवनाचा हरिनामाचा मंत्र सप्ताहातून मिळत असला तरी आरोग्याचा खरा गुरुमंत्रही दोन दिवसांपासून तज्ज्ञ डॉकटरांकडून मिळत असल्याने या सप्ताहाचे खर्या अर्थाने सार्थक झाले, असे प्रतिपादन आदिनाथ महाराज दुशिंग यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत