उंबरे : सचिन शेजुळ रघुनाथ महाराजांनी आपल्या वडिलांसोबत गावातील मारुती मंदिरात कथा श्रवण सुरू केले, हरिपाठही बाबा तेथेच शिकले, त्यामुळे ...
उंबरे : सचिन शेजुळ
रघुनाथ महाराजांनी आपल्या वडिलांसोबत गावातील मारुती मंदिरात कथा श्रवण सुरू केले, हरिपाठही बाबा तेथेच शिकले, त्यामुळे गावातील हनुमान मंदिर एक बाबांच्या आठवणींची मोठी ठेव समजली जाते. कालांतराने बाबा निष्णात झाले, मात्र तपोभूमि अगोदरच रघुनाथ बाबांच्या मृदुंग कलेवर खूष असणारे वांबोरीकर त्यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाचा आनंद उपभोगू लागले. सुरूवातीस ह्याच ठिकाणी असणारे व्यापारी पंढरीनाथ डोळसे यांच्या माडीवर बाबांची ज्ञानेश्वरी प्रवचने सतत होऊ लागली. रसाळ आणि सोप्या भाषेत अवघड विषय समजावून सांगण्याची त्यांची कला काही औरच वाटू लागली. प्रवचनाची गोडी लोकांना लागली. ही समाजाची नाडी बाबांनी ओळखली आणि त्यातूनच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्याची त्यांची कल्पना पुढे आली. प्रत्येक महिन्याच्या शुध्द 11 ला ते वृद्धेश्वराची वारी करायचे. त्याप्रमाणे पूर्व तयारी म्हणून वृद्धेश्वर येथे वांबोरी येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा घाट घातला. मिती. आषाढ शु 3 शके 1981 गुरूवार दि. 9 जुलै 1959 ते मिती आषाढ शुं 11 शके 1881 गुरूवार दि. 15 जुलै 1959 या काळखंडात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह वांबोरी येथील ह.भ.प.मुरलीधर अंभोरे यांच्या देखरेखीखाली सुरू केला. पारायण समाप्तीच्या आदल्या दिवशी महाराज उंबरे गावी आले. गृहपत्नीस आणि तिच्या वडिलांना मनातील हेतू सांगतिला मात्र या गोष्टीचा बोलबाला होऊ नये ह्याची खबरदारी त्यांनी घेतली. ( पुढचा भाग : महाराजांचे पहिले कीर्तन आणि अभंग)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत