रघुनाथ महाराजांचे पहिले कीर्तन ; सांगतो तुम्ही भजा रे विठ्ठला..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रघुनाथ महाराजांचे पहिले कीर्तन ; सांगतो तुम्ही भजा रे विठ्ठला..!

उंबरे : सचिन शेजुळ    पुज्यनिय रघुनाथ बाबा प्रवचन करत असताना त्यांच्या मधुर वाणीने श्रोते आकर्षित होऊ लागले, त्यातून लोक पारमार्थि...

उंबरे : सचिन शेजुळ
   पुज्यनिय रघुनाथ बाबा प्रवचन करत असताना त्यांच्या मधुर वाणीने श्रोते आकर्षित होऊ लागले, त्यातून लोक पारमार्थिक क्षेत्रांकडे वळू लागले. त्यात बाबांनी कीर्तन सुरू केले आणि संपूर्ण उंबरे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.                                                                 खरंतर,  रघुनाथ महाराजांनी कीर्तन करावे असा आग्रह लोकांनी धरला होता. परंतु श्रीपतबुवा सारखे विद्वान आणि श्रेष्ठ  थोर पुरुष असताना मी कीर्तन करणे योग्य नाही. असे त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. लोकाग्रह श्रेष्ठ ठरू लागला. आणि सर्वांनी वै. ह.भ.प श्रीपत बुवांना ही कल्पना सांगितली. त्यांनाही समाधान वाटले. आणि त्यांच्या परवानगीने आणि कृपाशिर्वादाने रघुनाथ बाबांनी पहिले कीर्तन उंबरे येथील महादेव मंदीरात केले. त्यावेळी हरिविजय ग्रंथाची सांगता होती. आणि त्यानिमित्ताने त्यांचे पहिले कीर्तन होते. या कीर्तनासाठी त्यांनी अभंग घेतला होता,
       सांगतो तरी तुम्ही भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया! ह्या अभंगावर त्यांनी सुंदर निरूपण केले. त्यानंतर प्रचार वाढला, दुसर्‍या वेळेस कोंढवड ह्या गावी, तर त्या नंतर शिलेगाव, तांदूळवाडी अशा तर्‍हेने बाबांची कीर्तने वाढू लागली आणि रघुनाथाचा ह.भ.प. रघुनाथ बुवा झाले. उंबरे गावात त्यावेळेस परमार्थिक कार्यास एक प्रकारचे उधान आले होते. भजन, ग्रंथवाचन, श्रवण, कार्तिक स्नान इत्यादी कार्यक्रम सुरू होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत