ग्लोबल स्कूल मध्ये ग्लोबल महोत्सव आनंदात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्लोबल स्कूल मध्ये ग्लोबल महोत्सव आनंदात साजरा

 राहुरी : प्रतिनिधी येथे ग्लोबल स्कूल मध्ये दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी ग्लोबल मोहत्सव राहुरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....



 राहुरी : प्रतिनिधी
येथे ग्लोबल स्कूल मध्ये दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी ग्लोबल मोहत्सव राहुरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रायणी ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन चे संस्थापक श्री गोरक्षनाथ ढोकणे व सौ इंद्रायणी ढोकणे व प्राध्यापक भगत सर यांच्या हस्ते झाले.  सालाबाद प्रमाणे या वर्षीही ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यामध्ये या आनंद मेळाव्यामध्ये फनी गेम चे आयोजन केले होते.  हे गेम्स खेळताना पालकांनाही आपले बालपण अनुभवायला मिळाले. तसेच या मेळाव्यामध्ये स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे मालाचे स्टॉल्स लावले होते. या स्टॉलच्या माध्यमातून मालाची विक्री करत असताना पालकांनी घासाघीस करून मुलांच्या व्यवहार ज्ञानाची परीक्षाही घेतली व खरेदीचा आनंदही लुटला. तसेच या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने खाऊगल्ली चेही आयोजन केले होते. सदर खाऊ गल्ली मध्ये पाणीपुरी पासून चायनीज व बाजरीचे भाकरी व भरीत  चे स्टॉल या आनंद मेळाव्यामध्ये लावले होते. या खाऊ गल्लीच्या स्टॉलवर लहान मुलांपासून ते आजी-आजोबा पर्यंत सर्वांनी स्वादिष्ट पदार्थांचा पोटभरून आस्वाद घेतला.
 या ग्लोबल महोत्सवामध्ये खेळ खरेदी आणि खाऊ गल्ली यांच्या जोडीला उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी विद्यार्थी व स्कूलच्या शिक्षकांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये स्कूल मध्ये वर्षभरात पार पडलेल्या विविध उपक्रमांचा समावेश केला होता. यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांचे मनोगत आपल्या भाषणातून सादर केले व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणाबरोबरच अध्यात्माचे देखील धडे दिले जातात आणि याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय तसेच मनाचे श्लोक व सीमेवर लढणार्या सैनिकांचा सैनिकांसाठी कविता देखील सादर केल्या. या कार्यक्रमांमध्ये छोट्या मुलांनी वेगवेगळ्या गाण्यावर ती नृत्य देखील सादर केले व उपस्थितांचे मने जिंकले.
 या वर्षीच्या ग्लोबल महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मिस्टर अँड मिसेस ग्लोबल हा खेळ होय. यावेळी मिस्टर ग्लोबल चे मानकरी ठरले श्री प्रशांत देठे व मिसेस ग्लोबल च्या मानकरी ठरल्या सौ ज्योती राऊत.  उपस्थितांनी या खेळाचा मनमुराद आनंद लुटला. फनी गेम्स मध्ये विजय पालकांना रोख स्वरुपातील बक्षिसे तसेच कथुरिया क्लॉथ सेंटर व घर-संसार एम्पोरियम यांच्याकडून खरेदीसाठी ची डिस्काऊंट कुपन देखील देण्यात आले. या कार्यक्रमासाठी सौ सोनाली प्राजक्त तनपुरे, श्री ज्ञानदेव शेलार सर, श्री दत्तात्रय काकडे सर, श्री सुशांतजी गायकवाड, श्री दीपकजी डावखर हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते श्री राहुल प्रेरणे सर व ग्लोबल स्कूलच्या प्राचार्य  प्राध्यापिका सौ सारिका ढोकणे मॅडम यांनी केले. यावेळी स्कूलचे प्राध्यापक डॉक्टर रामकिसन  ढोकणे सर  विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी स्कूलच्या प्राचार्य सौ साधना शिरसाट व स्कूलचे संपूर्ण शिक्षक वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत