5 वर्षाचा मासिक भत्ता जनतेसाठी देणार : विमलताई ढोकणे यांची घोषणा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

5 वर्षाचा मासिक भत्ता जनतेसाठी देणार : विमलताई ढोकणे यांची घोषणा

उबरे : प्रतिनिधी उंबरे गावातील जनतेने आपल्याला मोठ्या विश्‍वासाने निवडून दिले आहे. आज गाव संकटात आहे. त्यामुळे गावातील लोकांसाठी आपण मदत...

उबरे : प्रतिनिधी
उंबरे गावातील जनतेने आपल्याला मोठ्या विश्‍वासाने निवडून दिले आहे. आज गाव संकटात आहे. त्यामुळे गावातील लोकांसाठी आपण मदत केली पाहिजे, या विचारातून आपल्या पाचही वर्षाचा 12 हजार रुपयांचा मासिक भत्ता जनतेसाठी देण्याचा मोठा निर्णय ग्रामपंचायत सदस्या विमलताई सुदाम ढोकणे यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, त्यांनी ग्रामपंचायतीला देण्यासाठी तसे पत्र तयार केले असून त्या रक्कमेतून प्रभाग क्रमांक पाचमधील गरजू लोकांना किराणा वाटप करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रभाग क्रमांक पाचचे महिला लोकप्रतिनिधी म्हणून सौ. विमलताई सुदाम ढोकणे या पाच वर्षापुर्वी निवडून आलेल्या आहेत. या पाच वर्षाच्या कालावधीत या प्रभागातील विविध प्रश्‍नांकडे त्यांनी लक्ष वेधले व त्याचा पाठपुरावा करत कामेही मार्गी लावली आहेत. त्यासाठी अनेकदा त्यांनी ग्रामसेवक व पदाधिकार्‍यांना धारेवर धरत पाच क्रमांक वार्डातील गटारी, रस्ते, पाईपलाईन लिकेज, नियमीत पाणीपुरवठा, स्वच्छता, औषध फवारणीबाबत कामे करून घेतली आहेत.
आता कोरोनाचे भयानक संकट गावावर आले आहेत. गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद असल्याने गावातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक गरीब कुटूंबाला मदत करण्याची गरज आहे. अशावेळी आपण ज्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतो,ज्या  प्रभागातील लोकांनी आपल्या मते देवून निवडून दिले आहे, त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपला पाच वर्षाचा मासिक 200 रुपयांप्रमाणेचा 12 हजार रुपयांचा भत्ता त्यांनी जनतेसाठी खर्च करण्याची परवागनी दिली आहे.
उंबरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना देण्यासाठी विमल ढोकणे यांनी तसे लेखी पत्र तयार केले असून आपली सर्व रक्कम ही प्रभाग क्रमांक पाचमधील जनतेसाठीच खर्च करावी, गरजू 40 कुटूंबाची यादी बनवून त्यांना प्रत्येकी 300 रुपयांचा मोफत किराणा द्यावा, यातून काहीसा हातभार लागेल, असे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच माजी सरपंच  संतोष ढोकणे यांनी 500 मास्क आणि 500 सॅनिटायझर बाटल्या देवून आपले कर्तव्य पार पाडले होते. त्यानंतर आता विमलताईंनीही 12 हजारांचा भत्ता जनतेसाठी दिल्याने अन्य सदस्यांच्या भूमिकेकडेही गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत