नगर : राज्य निवडणूक आयोगाने दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या आदेशाने राज्यातील 19 जिल्ह्यातील माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालाव...
नगर :
राज्य निवडणूक आयोगाने दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या आदेशाने राज्यातील 19 जिल्ह्यातील माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्या व नव्याने स्थापित सलमारे एक हजार 570 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेला कोव्हीड-19 (कोरोना) विषाणु देशात तसेच महाराष्ट्रातही संक्रमित होत असल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात कोरोना विषाणुमुळे उदभवणार्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती नमूद करून, दि. 13 मार्च 2020 च्या अधिसुचने अन्वये साथरोग अधिनियम- 1897 च्या खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी राज्यात सुरु केली आहे. तसेच, दि. 14 मार्च 2020 च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र कोव्हीड-19राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्ह्यासह 19 जिल्ह्यातील माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्या व नव्याने स्थापित सुमारे एक हजार 570 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र कोरोना संसर्गजन्य आजारामुळे या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. अशा राज्यातील तब्बल एक हजार 570 ग्रामपंचायतीचा सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने संबधित जिल्हा परिषदांना दिले आहेत. यामुळे गाव पातळीवरील राजकारणात एकच खळबळ उडाली असून सक्षम प्राधिकारी म्हणुन कोणाची नेमणुक होते याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना संसर्गाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रत्येक घटकाला फटका बसला असून असाच फटका स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय व्यक्तींनाही बसण्यास सुरुवात झाली आहे.
प्राधिकारी म्हणुन कोणाची वर्णी?
मुदत संपलेल्या राज्यातील एक हजार 570 ग्रामपंचायतींचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 च्या कलम 35 अन्वये उचित अधिकार्यांना तात्काळ प्राधिकृत करण्यात यावे, असे आदेश संबधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. यामुळे आता या ग्रामपंचायतींवर प्राधिकारी म्हणुन पंचायत समिती विस्ताजराधिकारी, ग्रामसेवक, की आणखी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
उपाययोजना नियम, 2020 निर्गमित केला आहे. त्याव्दारे, आयुक्त/संचालक आरोग्य सेवा, वैदयकिय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे या साथरोगाच्या नियंत्रण उपाय योजनेसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुमुळे उदभवणार्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालील परिस्थिती, साथरोग अधिनियम-1897 ची सुरु झालेली अंमलबजावणी व राज्यात सदर साथरोगाचा प्रार्दुभाव/संक्रमण प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्तावित निवडणूकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम या पार्श्वभूमीवर आगामी 3 महिन्यांमध्ये राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यासर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित असणार्या निवडणूका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील 3 महिने कोणत्याही निवडणूका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
त्यास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाने संदर्भ क्र. 3, दि. 17 मार्च 2020 अन्वये 19 जिल्हयातील एक हजार 570 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर असेल त्याच टप्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत