उंबरे : प्रतिनिधी उंबरे ग्रामपंचायतीने किराणा वाटप केले आहे, मात्र अजूनही काही लोक वंचित असल्याने एकाला द्यायचं आणि दुसर्याने फ...
उंबरे : प्रतिनिधी

उंबरे ग्रामपंचायतीने किराणा वाटप केले आहे, मात्र अजूनही काही लोक वंचित असल्याने एकाला द्यायचं आणि दुसर्याने फकत पाहायचं, अशी अन्यायकारक वागणूक गावातील अनेक कुटुंबाना मिळाली आहे, तरी या किराणा वाटपाची चौकशी व्हावी, व गावातील उर्वरित सर्व कुटुंबाला देखील मोफत किराणा वाटप करावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते गणेश तोडमल यांनी केली आहे, उंबरे ग्रामपंचायतीने गावात किराणा वाटल्याने त्यांचे आभार मानले पाहिजे, मात्र सर्व किराणा दुकांनदारकांडून थोडी थोडी खरेदी करायला पाहिजे होती, जेणेकरून कोरोना संकटात सर्वाना हातभार लागला असता, किंवा ज्यांच्यासाठी हा निधी खर्च करायचा आहे, त्या लाभार्थी कुटुंबाला डायरेक्ट पैसे दिले असते ,तरी त्यांना गरजेच्या वस्तू घेता आल्या असत्या, मात्र, जो किराणा वाटप केला आहे, तो प्रत्येकाला किती मिळाला, याचाही प्रश्न आहेच, यामध्ये अनेक गरजु आजही वंचित राहिले आहेत, अनेक जण पिशव्या घेऊन आले पण चिठ्या नसल्याने त्यांना माघारी जावे लागले, अनेकांच्या शेजारी किराणा भेटला, पण जाणीवपूर्वक आपणास डावलले गेले अशी भावना काहींच्या मनात निर्माण झाली आहे, तर तोंड पाहून आणि निवडणुका आल्याने मतदान घेण्यासाठी जास्त मते असलेल्या कुटुंबाची निवड केल्याचेही बोलले जात आहे. खरतर हे पैसे जनतेचे आहेत, त्यातून किराणा वाटप केले आहे, अजून पैसे खर्च करा, पण गावात सर्वाना किराणा वाटप करा, कुणालाही डावलू नका,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत