उंबरे शाळेत बाहेरगावरून आलेले 16 जण कोरंटाईन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे शाळेत बाहेरगावरून आलेले 16 जण कोरंटाईन

उंबरे : प्रतिनिधी    सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर उंबरे गावात बाहेर गावावरून आलेल्या 16 ग्रामस्थांना ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा  कमिटी...

उंबरे : प्रतिनिधी 
  सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर उंबरे गावात बाहेर गावावरून आलेल्या 16 ग्रामस्थांना ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा  कमिटीने जिल्हा परिषद शाळेत कौरंटाईन केले आहे, 10 दिवस शाळेत राहिल्यानंतर संबंधीतास घरी सोडण्यात येत आहे.    याबाबत माहिती अशी की, सध्या कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे, यामुले उंबरे ग्रामपंचायतीने व ग्राम सुरक्षा कमिटीने गावाची काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेतला आहेत, त्यात उंबरे गावात बाहेर गावावरून आलेल्या ग्रामस्थांना आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यासाठी शाळेमध्ये विलगिकरण कक्ष तयार केले आहेत, बाहेर गावावरून आलेल्या आपल्याच गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांना शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांच्या नियोजनासाठी कामगार तलाठी अंकुश सोनार हे जातीने लक्ष ठेऊन आहेत, तर ग्रामसेवक शेख भाऊसाहेब त्यांच्या सोयीसुविधेसाठी कटीबध्द आहेत, याशिवाय सरपंच राजेंद्र ढोकणे, पोलीस पाटील गोरक्षनाथ देव्हारे हे देखील अहोरात्र उभे आहेत, शाळेच्या आवारात कर्मचारी रवींद्र देव्हारे हे दररोज औषध फवारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करत आहेत, सफाई कर्मचारी महिला नित्यनेमाने आवारात सफाई करत आहे, कर्मचारी रवींद्र ढोकणे हे देखील सर्वाना सहकार्य करत आहे,  अशा पद्धतीने गावात विलगिकरण कशात सुविधा दिल्या आहेत, शिक्षक लोंढे सर व त्यांचे सर्व कर्मचारी दररोज उपस्थित राहून कर्तव्य बजावत आहेत, दरम्यान, कॉरनटाईन कक्षात दररोज घरून जेवणाचे डबे पाठवले जात आहेत, त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने पोषक आहाराचे डबे दिले जावेत त्यांना सकाळी नास्ता व चहा ग्रामपंचायतीने पुरववा , कक्षात थ्री फेज वीज पुरवठा करावा, उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलांचा विचार करून वातानुकूलित सुविधा द्यावी,  अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठान यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत