उंबरे : प्रतिनिधी उंबरे ग्रामपंचायत अनेक ठिकाणी खर्च करत असते, आता कोरोना संकटात गावातील मागासवर्गीय व गोरगरीब नागरिकासाठी ग्रामपंचाय...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे ग्रामपंचायत अनेक ठिकाणी खर्च करत असते, आता कोरोना संकटात गावातील मागासवर्गीय व गोरगरीब नागरिकासाठी ग्रामपंचायतीने आपला निधी खर्च करावा व या कुटुंबाला अन्नधान्य, किराणा वाटप करावे, अशी मागणी युवानेते पैलवान गणेश तोडमल यांनी केली आहे. तोडमल म्हणाले, उंबरे ग्रामपंचायतीने अनेक कामावर मोठा खर्च केला आहे, मात्र त्यावर राजकारण करण्याची ही वेळ नाही, योग्यवेळी आपण पुराव्यानिशी बोलणार आहोत, मात्र सध्या कोरोनाने मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा वेळी गावातील रेशन कार्ड नसलेले गोरगरीब जनता, हातावर पोट असलेले कुटम्ब आणि माळवाडी व गावातील मागासवर्गीय कुटुंब यांना ग्रामपंचायतीने मदत करण्याची गरज आहे. हा समाज आपल्या गावातील आहे, त्यांचे आपल्याला मते चालतात, मग त्यांना तितक्याच अधिकाराने ग्रामपंचायतीने मदत करण्याची गरज आहे, तरी माझी सर्व सदस्यांना हातजोडून विनंती आहे की, मागासवर्गीय समाज आणि गोरगरीब जनता अशी किमान 500 कुटुंबाला किराणा किंवा रोख स्वरूपात मदत करावी व त्यांना धीर द्यावा, असे तोडमल म्हणाले,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत