राहुरी वेबटीम : राज्यात लॉकडॉउन शिथिल होताच अनेक व्यापाऱ्यांनी हात धुवून घेतले , त्यात आपल्याकंडील काही सिमेंट व्यापार्यांनीही अव्वाच...
- राहुरी वेबटीम : राज्यात लॉकडॉउन शिथिल होताच अनेक व्यापाऱ्यांनी हात धुवून घेतले , त्यात आपल्याकंडील काही सिमेंट व्यापार्यांनीही अव्वाच्या सव्वा दराने माल विकून मोठी माया कमविली, एकाने तर 250 रुपयांची गोणी चक्क 430-460 रुपयांना विकून या तीन महिन्यात कोटींची माया कमविली व याच गोरगरिबांच्या लूटलेल्या पैशातून जमीन खरेदी केल्याच्या चर्चेने तालुका ढवळून निघाला आहे, दरम्यान या व्यापाऱ्याच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लॉकडाऊन सुरू असताना अनेकांनी आपले व्यवहार चोरुन सुरूच ठेवले होते, त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तर काही व्यापाऱ्यांनी हीच संधी पकडून आपल्या मालाचे भाव दुप्पट केले, आता माल शिल्लक नाही, शॉर्टज आहे, अशी कारणे देऊन 250 रुपयांची सिमेंट गोणी चक्क 450 रुपयांपर्यंत विकत गोणीमागे 180 ते 200 रुपयांची माया कमावली, स्टीलमध्येही 38 वरून थेट 50-55 रुपये पर्यंत भाव वाढवले, मात्र, गरजू लोकांनी पावसाळा डोक्यावर असल्याने नाईलाजाने हे विकत घेत मनात त्या व्यापाऱ्याला शिव्या शाप दिले, अनेकांनी याबाबत उघड नाराजीही व्यक्त केली, असे असतानाही या बहादराने या महिनाभरात अवाच्या सव्वा दराने माल विकून कोटींची माया जमवली, यामध्ये विशेष असे की, या व्यापाऱ्यांकडे काहींनी रोख पैसे देऊन लोकडॉउन पूर्वी 265 रुपयांनी सिमेंट बुक केले होते, मात्र ते जेंव्हा दुकानात आले, त्यावेळी माल शिल्लक नाही असे सांगून त्यांची बोळवण केली, तर त्यानी पाठ फिरवतात हा बहादर ब्लॅकने 430 रुपयाला गोण्या विकायचा, काही दांडगे लोक आडवे लागल्याने त्यांना तो व्याजासह पैसे परत देतो, पण सिमेंट नाही, असे हात जोडून सांगत होता, यातून अनेकदा वाद ही झाले, काहींनी शिव्या दिल्या तर काहींनी बाह्याही सावरल्या, मात्र पैशांच भूत लागलेल्या या लट्ठड व्यापाऱ्याला कोणाचंही सोयर सुतक नव्हते, आजही त्याचा हा काळा धंदा जोरात सुरू आहे, काही दिवसापूर्वींच त्याने गोरगरिबांच्या तळतळताटून जमा केलेल्या पैशातून जवळच्या गावातच मोठी शेती खरेदी केल्याची ही चर्चा आहे, त्यामुळे माणसाचे रक्त शोषणार्या या व्यापाऱ्याच्या व नातेवाईकांच्या संपत्तीची कसून चौकशी करावी तसेच, त्याने लॉकडाऊन मध्ये विकलेल्या मालाची पावतीनुसार पंचनामे करावेत, अनेक ग्राहक उघडपणे या व्यापाऱ्यांचा ' पंचनामा' करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे ' हे 'प्रकरण आता वरती पाठविण्यासाठी काही ग्राहक हालचाली करत असल्याचीही माहिती समोर आली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात नकीच हा व्यापारी अडचणीत येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत