उंबरे गावात अतिवृष्टीने लोकांच्या घरात पाणी घुसले असताना जनता हैराण झाली आहे तर पदाधिकारी मात्र 30 लाखांच्या कामाचे ‘सौदे’ करण्यात मग्न असल्...

उंबरे गावात अतिवृष्टीने लोकांच्या घरात पाणी घुसले असताना जनता हैराण झाली आहे तर पदाधिकारी मात्र 30 लाखांच्या कामाचे ‘सौदे’ करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. तसेच अंगणवाडी साहित्य खरेदीवरूनही जोरदार खडाजंगी सुरू असल्याने गावातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यावेळी दलित वस्तीची गटार गायब का केली ? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केल्याने याविषयी चर्चेला उधाण आले आहे.
उंबरे गावात काल जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचे पाणी गावातील पशुवैदयकीय दवाखान्यात घुसले आहे तसेच परिसरातील घरांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. या घरांमध्ये अनेक लहान मुले आहेत. अशावेळी झालेल्या या पावसामुळे या कुटूंबाना रात्र जागून काढावी लागली. पाणी साचलेले असल्याने परिसरातील लोकांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे. यातून रोगराईची भिती आहे. तसेच पशुवैदकीय दवाखान्यातही पाणी असल्याने तेथे जाणे डॉक्टरांनाही शक्य होताना दिसत नाही. वास्तविकतः या परिस्थितीकडे तेथील लोकांनी ग्रामपंचायतीचे अनेकदा लक्ष वेधले होते. त्यांनी आमच्या भागात मुरूम टाका, पाणी बाहेर जाण्यासाठी खोदकाम करा, अशी मागणी केली होती. तसेच सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनीही मुरूम टाकून मिळावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांना सांगितले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने कालच्या पावसाच्या पाण्याने दाणादाण उडवली. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी आज सकाळी पदाधिकार्यांना ‘.....’ लावले. यावेळी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त महिलांनीही तर मतं मागायला आले तर याद राखा, असा सज्जड दम भरत या भागात त्यावर ग्रामसेवक शेख यांनी तत्काळ मुरूम टाकून देवू, अशी ग्वाही दिल्यानंतर या प्रकरणावर तूर्त पडदा पडला. मात्र, यावेळी दलित वस्तीची गटार योजना कुठं केली ? या विषयाचीही चर्चा होवून काही दिवसांपुर्वी कागदपत्री झालेली, त्यावर पुन्हा दुरुस्ती झालेली गटार नेमकी कुठंय ? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, तत्पुर्वी कॉरन्टाईन कक्षावरही गोंधळ झाला. या गोंधळाचे चुकीचे इतिवृत्त ‘एका’ने आपल्या नेत्यांपर्यंत इमाने इतबारे तेही सविस्तर पोहचवल्याने याविषयीही मोठी चर्चा सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत