राहुरी वेबटीम : उंबरे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत शिल्लक असलेल्या रक्कमेतून गावात 30 लाख रुपयांची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल...
राहुरी वेबटीम :
उंबरे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत शिल्लक असलेल्या रक्कमेतून गावात 30 लाख रुपयांची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, काही दिवसांवर येऊन ठेपलेली आगामी निवडणूक लक्षात घेता ही लाखो रुपयांची कामे सत्ताधाऱ्यांसाठी चांगलीच 'किमतीची व फायदेशीर' ठरणार आहेत. उंबरे ग्रामपंचायती समोरील अंगणवाडी समोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे 2 लाख 21 हजार 903 रुपये, माळवाडी मराठी शाळेसमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे कमी 3 लाख 56 हजार 283 रुपये, जि प शाळा गेट बसवणे 1 लाख 6 हजार 94 रुपये, आरसीसी बंदिस्त गटार योजना हॉस्पिटल ते मराठी शाळा 4 लाख 43 हजार 911 रुपये, माळवाडी शाळा दुरुस्ती आणि रंगकाम 3 लाख 19 हजार 144 रुपये, स्मशानभूमी सुशोभीकरण 8 लाख 92 हजार 50 रुपये, सिमेंट काँक्रिट रोड 6 लाख 73 हजार 634 रुपये आशा प्रकारे कामे मंजूर झाली आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात गावात अनेक विकास कामे झालेली आहेत, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वछता तसेच पर्यावरण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण इत्यादींवर भरीव कामे झाली आहेत. आता पुढील महिन्यात ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली आहेत, त्या पूर्वीच सत्ताधारी सदस्यांनी गावातील कामासाठी हा निधी खर्च करण्यासाठी उत्तम नियोजन केले आहे, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी पाच वर्षे गावाची मोठी सेवा केली आहे, त्यांच्या या कार्यकाळातील हे शेवटची कामे असणार आहेत, त्यामुळे ही कामे नक्कीच चांगल्या दर्जाची व गुणवत्तेची होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे, दरम्यान, या कामावर निधी खर्च केला जात असताना काही पैसे शिल्लक असतील तर ते देखील अमरधाम, बाजारातल स्वछता, गावातील काट्या काढणे, मुरूम टाकणे, गावात स्ट्रीट लाईट बसवणे, साहित्य खरेदी, व्हॉव्ह दुरुस्ती, इत्यादी काही कामे शोधून खर्च करावीत, जेणे करून ती रक्कम पुन्हा मागे जाणार नाही, अशीही मागणी केली जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत