नगर : वेबटीम। कोरोना पार्श्वभूमीवर जमावबंदी कलम असताना तसेच विविध नियम व अटी असतानाही त्याचे उल्लंन्घन करून वाढदिवसाजरा केल्याबद्दल नगरचे आ...
नगर : वेबटीम।

कोरोना पार्श्वभूमीवर जमावबंदी कलम असताना तसेच विविध नियम व अटी असतानाही त्याचे उल्लंन्घन करून वाढदिवसाजरा केल्याबद्दल नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एखाद्या ठिकाणी एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे. परंतु आमदार संग्राम जगताप यांचा काल वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यक्रमात नियमांचे पालन केले नाही.
विनामास्क एकत्र येऊन, कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध आज कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
कोतवाली पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील कर्मचारी सचिन गोरे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 12 जून 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अभिजित खोसे, बाबा गाडळकर, संतोष ढाकणे, माऊली जाधव यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्ते आयुर्वेद कॉलेज परिसरातील आमदार जगताप यांच्या कार्यालयासमोर जमले होते.
जगताप यांच्यासह या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. गोरे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 188 व 269 अन्वये जगताप यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत