जाणून घ्या, सईचं पहिलं प्रेम...लग्न आणि घटस्फोट ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जाणून घ्या, सईचं पहिलं प्रेम...लग्न आणि घटस्फोट !

मुंबई : वेबटीम सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर...

मुंबई : वेबटीम सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.सई ही मराठी इंडस्ट्रीतील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.ती कधीच आपले खाजगी आयुष्य मीडियापासून लपवत नाही. तिला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून तिच्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. तुम्हाला माहीत आहे का, सईचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण काही कारणास्तव त्या दोघांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. आज सई तिचे सिंगल आयुष्य अतिशय आनंदित जगत आहे.सई आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय आणि सईने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रीण चांगलेच खूश झाले होते. त्या दोघांनी ७ एप्रिल २०१२ ला साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर ते दोघे लगेचच लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण सई कामात व्यग्र असल्याने त्यांनी एक वर्षं लग्न पुढे ढकलले. अमेय देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केलेले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता. पण त्या दोघांनी अचानक घटस्फोट घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत