श्रीरामपूर : वेबटीम कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. तसेच गर्दी होऊ नये यासाठी धार्म...
श्रीरामपूर : वेबटीम

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. तसेच गर्दी होऊ नये यासाठी धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, स्थानकवासी जैन संघाने श्रीरामपूर येथे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे या कार्यक्रमाला गर्दी झाली. या प्रकरणाची दखल घेत संघाचे अध्यक्ष रमेश इंद्रभान लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई अर्जुन दत्तात्रेय पोकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी रमेश इंद्रभान लोढा (रा. मेन रोड, श्रीरामपूर) यांनी नगर जिल्हाधिकारीयांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून स्थानकवासी जैन संघ (श्रीरामपूर) येथे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम घेतला. म्हणून शहर पोलिसांनी रमेश इंद्रभान लोढा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय दुधाडे करीत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत