मुंबई : वेबटीम मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४७२०० रुपये झाला. त्यात १३४ रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी सोने ४७३३...
मुंबई : वेबटीम 
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४७२०० रुपये झाला. त्यात १३४ रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी सोने ४७३३४ रुपयांवर बंद झाले होते. चांदीचा भाव मात्र २९० रुपयांनी कमी झाला आहे. सध्या कमॉडिटी बाजारात चांदीचा भाव किलोला ४७४०० रुपयांवर ट्रेड करत आहे.
करोना रोखण्यासाठी २५ मार्चपासून केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने आणि बाजारपेठा पूर्ण बंद होत्या. मात्र गेल्या आठवड्यात टाळेबंदी शिथिल करण्यात आली. मुंबईत आता समविषम पद्धतीने दुकाने खुली झाली आहेत. त्यानुसार मुंबईतील शेकडो वर्ष जुना असलेल्या दक्षिण मुंबईतील झवेरी बाजातात देखील सराफांची दालने खुली झाली आहेत. दादर, लालबाग, अंधेरी, बोरिवली येथील बड्या सराफांची दालने आता खुली झाली आहेत. मात्र सराफांना कारागिरांचा तुटवडा जाणवत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत