नेवासा ; . नेवासा तालुक्यातील सौन्दळा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी 9 वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी ही शनिवार दि.20 जून रोजी रात्री तिच्या ...
नेवासा ; . नेवासा तालुक्यातील सौन्दळा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी 9 वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी ही शनिवार दि.20 जून रोजी रात्री तिच्या मोठ्या बहिणी सोबत गावातील घरात झोपली होती.रविवार दि.21 रोजी सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला झोपेतून उठविले असता ती झोपेतून उठली नाही.सर्पदंश झाला असेल असे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरने तपासून ती उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले.ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चे खबरी वरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजी नंबर 70/2020 सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मिक निधनाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान मयत मुलीने निधन हे सर्पदंशानेच झाले असल्याचे कारण स्पस्ट होऊ शकलेले नाही.तिच्या पायावर दोन तीन ठिकाणी जखमा दिसून आल्याने मृत्यूचे नेमके कारण ही ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना समजले नसल्याने या मुलीचा मृतदेह पुढील तपासणी साठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे.
श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे,शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जवळे,नेवासाचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे,सहाय्यक निरीक्षक भारत दाते यांचे पथकाने सौंदाळा येथे घटना स्थळाला भेट देऊन मयत मुलीचे आई-वडील व इतर नातेवाईकांची सुमारे तासभर कसून चौकशी केली.मयत मुलीचे आई-वडील,मोठी बहीण व त्यांच्याकडे शिक्षणासाठी रहात असलेला आत्याचा मुलगा असे 4 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत