नागपूर : १७ वर्षीय पीडित मुलगी ही इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या वस्तीत राहणारा अल्पवयीन मुलगा अमोलशी (नाव बदलेले) तिची ओळख झा...
नागपूर :
१७ वर्षीय पीडित मुलगी ही इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या वस्तीत राहणारा अल्पवयीन मुलगा अमोलशी (नाव बदलेले) तिची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतरण पुढे प्रेमसंबंधात झाले. पीडितेच्या तक्रारीनुसार सामुहिक अत्याचाराची घटना ९ मार्च रोजी घडली. पीडित मुलगी ट्युशनहून घरी परत येत असताना अमोलने तिला थांबविले व बळजबरीने आपल्यासोबत आपला मित्र रोहितच्या घरी नेले. यावेळी रोहितच्या घरी रोहितसोबत त्याची एक मैत्रीणही उपस्थित होती. अमोल आणि रोहित यांनी पीडित मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला व रोहितच्या मैत्रिणीने याचा व्हिडीओ तयार केला. या दोघांनी तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि सातत्याने शरीरसुखाची मागणी करू लागले. अखेर पीडितेन ही बाब कुटुंबीयांना सांगितली आणि या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत