हा उद्योग कराल तर होताल मालामाल ; वाचा अधिक माहिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हा उद्योग कराल तर होताल मालामाल ; वाचा अधिक माहिती

मुंबई:वेबटीम गेल्या वर्षी सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बांबू उद्योगाला नवी चालना मिळाली आहे. ...

मुंबई:वेबटीम गेल्या वर्षी सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बांबू उद्योगाला नवी चालना मिळाली आहे. बाजारात बांबूपासून बनलेल्या वस्तू वापरण्याकडे आता कल वाढताना दिसतोय. बांबूच्या बॉटल, बांबूचे कप, प्लेट, चमचे, काटे चमचे, ताटं, लँप, ज्वेलरी, हँडीक्राफ्ट यांसारख्या वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना पैसे कमावण्यासाठी आता या व्यवसायामुळे नवी संधी मिळाली आहे. सरकारकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर बांबूच्या उत्पादनांमध्ये वाढ होताना दिसतेय. खादी ग्रामोद्योग आयोगकडूनही (khadi gramodyog commission) बांबूच्या बॉटल तयार करुन बाजारात विक्रीसाठी आणल्या होत्या. खादी ग्रामोद्योग आयोगाकडून खादी, मध, कुटीरोद्योगांसह आता बांबू व्यवसायाकडेही विस्ताराने लक्ष देण्यात येत आहे. खादी ग्रामोद्योग आयोग बांबू मिशनअंतर्गत लोकांना बांबूच्या वस्तू तयार करण्याचं ट्रेनिंग देत आहे. त्याशिवाय काम सुरु करण्यासाठी कर्जाचीही मदत करत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वेबसाईटवरुन www.kvic.gov.in/kvicres/index.php अधिक माहिती जाणून घेता येऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत