तीन बायका फजिती ऐका! 3 महिलांसोबत संसार करण्याचं स्वप्न आलं अंगलट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तीन बायका फजिती ऐका! 3 महिलांसोबत संसार करण्याचं स्वप्न आलं अंगलट

पुणे : वेबटीम।      तीन बायका फजिती ऐका ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यालाच शोभेल असा एक प्रकार पुण्यात घडला आहे. पाच वर्षांपूर्वी ...


पुणे : वेबटीम। 
    तीन बायका फजिती ऐका ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यालाच शोभेल असा एक प्रकार पुण्यात घडला आहे. पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याने दुसरे लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचा छळ करत तिला माहेरी जायला भाग पाडलं. त्यानंतर तिसऱ्या महिलेशी सुत जुळवत एकत्र राहू लागला. मात्र, हे करताना अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
 
शिरुर तालुक्यातील करंदीच्या गावच्या प्रशांत नप्तेवर या प्रकरणी शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तिसऱ्या अपत्यासह एका महिलेला घरी आणणाऱ्या या नराधमावर शिक्रापूर पोलिसांनी तक्रारदार पत्नी जयश्री नप्ते हिच्या तक्रारीवरुन पैशांसाठी छळाचा गुन्हा दाखल केला आणि सगळं प्रकरण उघड झाले
पहिली पत्नी प्रज्ञा नप्ते हीच्या मृत्यूच्या तपासाची संपूर्ण माहिती शिक्रापूर पोलीस मागवित असून प्रशांत नप्ते याचेसह त्याचे आई-वडील, बहीण व दाजी यांना लवकर अटक करणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जयश्री यांचे प्रशांत नप्ते यांचेशी जानेवारी 2015 मध्ये लग्न झाले होते.
लग्नाच्या पहिल्या महिन्यानंतर लगेच सासू शारदा, सासरा कैलास यांनी छळ करायला सुरवात केली व घरातील खाण्यापिण्याचे पदार्थही ते लपवून ठेवू लागले. पती प्रशांत व सासरे कैलास यांनी तर दारु पिऊन माहेरुन पैसे आणावेत म्हणून शिवीगाळ-दमदाटी सुरू केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत