मुळा धरणात गेल्या वर्षीपेक्षा 3 टीएमसी पाणी जास्त ; वाचा आजची आवक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा धरणात गेल्या वर्षीपेक्षा 3 टीएमसी पाणी जास्त ; वाचा आजची आवक

राहुरी : वेबटीम मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाचा लपंडाव सुरू असल्याने आवक मात्र अजुनही अपेक्षित वाढताना दिसत नाही. काल  मंगळवारी सायं...

राहुरी : वेबटीम
मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाचा लपंडाव सुरू असल्याने आवक मात्र अजुनही अपेक्षित वाढताना दिसत नाही. काल  मंगळवारी सायंकाळी धरणात 3200 क्युसेकने आवक सुरू होती. त्यामुळे धरणात पाणी बर्‍यापैकी जमा होताना दिसत होते. मात्र काल पावसाचा जोर ओसरल्याने आज पुन्हा आवक कमी झाली आहे. आज बुधवारी सायंकाळी 1513 क्युसेकने आवक सुरू होती. तर धरणाचा पाणीसाठा 8100 क्युसेक इतका झाला होता.
दरम्यान, यंदा पाणलोटात पाऊस कमी असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात यंदा तीन टिएमसी पाणीसाठा अधिक आहे. गेल्या वर्षी 8 जुलै 2019 रोजी धरणात 5 टिएमसी पाणीसाठा होता. तर यंदा तो 8100 इतका असल्याने शेतकरी काहीअंशी समाधानी आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत