प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्या-शिक्षक परिषदेची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्या-शिक्षक परिषदेची मागणी

  पुणे : वेबटीम      स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणासाठी कुठल्याही प्रकार...

  पुणे : वेबटीम 
   स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती उपलब्ध नाही.तरी राज्यशासनाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना ही पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणासाठी (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्या प्रमाणे) निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासन निर्णय:- शालेय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. -१०९५/५४७८३/(१७७९/९५)सर्व.शि-५दि.२९ऑगस्ट१९९५ संदर्भांनव्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने नाम.मा. श्रीमती वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य, नाम. मा. श्री बच्चुभाऊ कडू साहेब राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य, मा.अप्पर मुख्य सचिव साहेब शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, मा. शिक्षण आयुक्त साहेब शिक्षण  आयुक्तालय महाराष्ट्र पुणे, मा. शिक्षण संचालक साहेब प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे

         उपरोक्त वरील मुद्याचा सहानुभूतीने  विचार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार मा  संजय केळकर , राज्याध्यक्ष  राजेंद्र सुर्वे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,     बाबुराव पवार,  सुनील पाटील,कार्यवाह सुधाकर मस्के ,संघटन मंत्री सुरेश दंडवते,   राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले गुरूजी ,राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे , कोषाध्यक्ष संजय पगार,  राज्य उपाध्यक्ष प्रकाश चतरकर,अविनाश तालापलीवार, मंच्छित्र गुरमे  , प्रकाश चुनारकर, रविकिरण पालवे,राजेंद्र नांद्रे, मंगेश जैवाळ, बाबुराव गाडेकर , सुनील केणे ,   संजय निजापकर , भरत मडके , डॉ सतपाल‌ सोवळे प्रविण ठुबे , विकास गवते ,‌संजय शेळके  ,  महादेव चाटे, श्रीराम बोचरे, डि.एम.पंडागळे.  दिलीप पाटील ,  विजय साळवे , विलास बोबडे , राजेंद्र शिंगाडे , रमेश गोहील, आबा बच्छाव , अवधूत वानखेडे , निळकंठ गायकवाड ,प्रकाश गुरव ,प्रशांत वाघमारे  , भगवान घरत  , शांताराम घुले  , संजय कोठाळे , भगवान जायभाय,कृष्णकांत मलिक , उमेश पाटील, शैलेश चौकशे ,  राजेंद्र चौधरी,भिका सपकाळे,यांनी निवेदन दिले असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे यांनी दिली.

1 टिप्पणी

  1. प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळालेच पाहिजे,यास माझे पूर्ण समर्थन आहे.

    उत्तर द्याहटवा