मेष : नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे ताण वाढेल. मन अस्थिर होईल. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्कर...
मेष : नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे ताण वाढेल. मन अस्थिर होईल. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करून काम करावे लागेल. मित्रांची उत्तम मदत होईल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आर्थिक स्थिती चांगली राहील.
वृषभ : व्यवसायात भागीदाराशी करार करण्यापूर्वी विचार करावा. प्रिय व्यक्तीचा विरह सहन करावा लागेल. खर्च जपून करा. कार्यक्षेत्रात समस्या उद्भवू शकतात. एक ना धड, भाराभर चिंद्या, असे होऊ देऊ नका. व्यापार, उद्योग व व्यवसायात नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास समस्यांचे निराकरण शक्य.
मिथुन : नवीन व्यवसायिक योजना राबविण्यात अडचणी येतील. प्रकृतीबाबत जागरुक राहा. वाणीवर ताबा हवा. स्वतःसाठी वेळ द्यावा. घरात मंगल कार्याचे आयोजन होण्याचा योग. शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक ठरू शकते.
कर्क : परिचित व्यक्ती भेटल्याने आजचा दिवस संस्मरणीय होईल. व्यवसायातील अडचणींवर कौशल्याने मात कराल. चिंतामुक्त व्हाल. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेली कामे नियोजन करून पूर्णत्वास न्यावीत. दगदग जाणवेल. मन प्रसन्न राहील. नवीन संधी उपलब्ध होतील.
सिंह : कलहजन्य परिस्थिती निर्माण होईल. शांत राहा. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. मनाचेही ऐकण्याचा दिवस. हाती घेतलेल्या कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका. दिवसाचा उत्तरार्ध आनंदात जाईल.
कन्या : नवीन तंत्रज्ञान शिकाल. व्यवसायात नवीन धाडस तूर्तास नको. महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास विलंब होईल. मेहनतीचे महत्त्व ओळखून कार्यरत राहा. भाग्यावर विसंबून राहणे नुकसानकारक ठरू शकते. मित्रमंडळींची नाराजी ओढवून घेऊ नका.
तुळ : संमिश्र घटनांचा दिवस. नोकरीत सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. गोंधळात भर पडण्याचा दिवस. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. मालमत्ता खरेदीचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
वृश्चिक : व्यावसायिकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. अनेक प्रकारचे परिवर्तन घडणार असल्याचे संकेत देणारा दिवस. आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील. एखादी कृती सहकार्यांवर प्रभाव पाडेल. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील.
धनु : उत्साहवर्धक घटना घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याचा योग. वरिष्ठांकडून कौतुक होईल. विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
मकर : प्रेमाने भरलेला दिवस. नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. सामाजिक कार्यास आर्थिक हातभार लावाल. करिअरबाबत जागरुक राहावे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरदार वर्गाला पुरस्कार मिळण्याची शक्यता. व्यवसायात लाभ मिळतील. सुखद घटनांचा काळ.
कुंभ : भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव झाल्याने व्याकूळ व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. मित्राचा सल्ला लाभदायक ठरेल. रागावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा कार्यक्षेत्रावर प्रतिकूल परिणाम संभवतो. अचानक नवीन करार होण्याचे योग. कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
मीन : गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. प्रियजनांशी वाद होतील. पैसा व वेळ दोन्ही जपून वापरा. कार्यक्षेत्रातील ख्याती वृद्धिंगत होईल. हाती घेतलेली कामे गांभीर्यतेने घेतल्यास यश मिळेल. आर्थिक पक्ष मजबूत करणारा दिवस. नोकदार वर्गाला सर्वार्थाने अनुकूल दिवस. रागावर नियंत्रण ठेवावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत