मुळा धरणात किती आहे आवक ? वाचा खाली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा धरणात किती आहे आवक ? वाचा खाली

राहुरी : वेबटीम।  मुळा धरण पाणलोटात काल रात्री पासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने आता धरणाच्या दिशेने सुरू होणारी आवक थोडी मंदावल्याचे...

राहुरी : वेबटीम। 

मुळा धरण पाणलोटात काल रात्री पासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने आता धरणाच्या दिशेने सुरू होणारी आवक थोडी मंदावल्याचे चित्र आहे. काल सायंकाळी 6 वाजता मुळा नदीपात्रातून धरणाकडे 1391 क्यसुेकने आवक सुरू होती. तर धरणाचा उजवा कालवा 60 कुसेकने वांबोरीला पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेला आहे
मुळा धरणाकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून लाभक्षेत्रात पाऊस सुरू असला तरी पाणलोटात मात्र वरूणराजा रुसला होता. परंतु आता गेल्या तीन चार दिवसांपासून पाणलोटातील अकोले परिसरात पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण भरून 1600 कुसेकने पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे. परंतु काल  पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी हेच पाणी 1391 क्युसेकने सुरू होते. त्यामुळे धरणात 7900 दलघफू पाणीसाठा झाला होता.  धरणातून वांबोरी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार उजवा कालवा सुरू असून तो उद्या बंद होण्याची शक्यता आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत