'शिक्षक मित्र' राज्यातील शिक्षकांना दिशादर्शक ठरणार : आ. संजय केळकर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'शिक्षक मित्र' राज्यातील शिक्षकांना दिशादर्शक ठरणार : आ. संजय केळकर

    शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षक संघटना कायम संघर्ष करीत असतात परंतु  आपल्या कर्तव्याचीही जाण ठेऊन शिक्षक हिता बरोबरच राष्ट्रहित  शिक्...


   
शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षक संघटना कायम संघर्ष करीत असतात परंतु  आपल्या कर्तव्याचीही जाण ठेऊन शिक्षक हिता बरोबरच राष्ट्रहित  शिक्षणहित  व विद्यार्थीहिताचे काम जोपासण्याचे कार्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यभर होत आहे. 'शिक्षक मित्र' या राज्यस्तरीय  त्रैमासिकाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षकांना  एक मोठे खुले व्यासपीठ  उपलब्ध झालेले असून या द्वारे  अनेक उपक्रमशील, साहित्यिक ,कला ,क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक  क्षेत्रातील शिक्षकांना आपले विचार राज्यस्तरावर  अभिव्यक्त  करण्याची संधी शिक्षक परिषदेने उपलब्ध करून दिलेली आहे ही उल्लेखनीय बाब आहे. आपण राबवित असलेले उपक्रम आपण तयार केलेले साहित्य  हे आपल्या पुरता मर्यादित न रहाता राज्यस्तरावर प्रकाशित होऊन इतरांनाही ते प्रेरणादायी ठरणार असल्याने परिषदेच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी  व्हावे,  असे  आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांनी केले. .

  ' शिक्षक मित्र' या  राज्यस्तरीय ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त केले.  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या  वतीने शिक्षक मित्र  राज्यस्तरीय ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला गततीन  वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यात जिल्हास्तरावर सुरू केलेला हा उपक्रम  राज्याध्यक्ष राजेश सुर्वे  व राज्य कार्यकारिणीच्या सहकार्याने शिक्षक मित्र अंकाचे राज्यस्तरावर पुस्तक प्रकाशन होत असून राज्यातील शिक्षकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य संपादक तथा राज्याचे उपाध्यक्ष डॉ सतपाल सोवळे यांनी प्रास्ताविकात सांगितले शिक्षक मित्र पुस्तक राज्यातील प्रत्येक शिक्षकाच्या हाती पोहोचविण्याची जबाबदारी तसेच या त्रैमासिकाचे मासिकात रूपांतर करण्याची जबाबदारी परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असून यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहण्याचे  राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले गुरुजी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
संपादक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती व आगामी काळातील आव्हाने विचारात घेऊन राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल अशी पुस्तकाची रचना केल्याने शिक्षक मित्र हा राज्यस्तरीय त्रेमासिक अंक खऱ्या अर्थाने शिक्षकांना अध्ययन अध्यापनात शिक्षक मित्र होणार असल्याने राज्य कार्यकारणी संपादक मंडळास  पूर्ण ताकदीने मदत करणार असल्याचे  राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी याप्रसंगी सांगितले कार्यक्रमाची सुरुवात परिषद गीताने करण्यात आली स्वागत व संचालन राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी केले आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवर  राजेंद्र नांद्रे यांनी  केले. कार्यकारी संपादक म्हणून किशोर तळोकर सहसंपादक म्हणून विजय वाघ अरविंद वाघ मंदारपुंडशाश्री   हितेश राठोड  मनोज भुजबळे  निलेश सपाटे  संदीप कोल्हे  महादेव निमकर  डॉभारती ताठे यांचा समावेश आहे  सदर ऑनलाईन राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन सोहळ्यास कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे कोषाध्यक्ष संजय पगार संघटनमंत्री सुरेश दंडवते   बाबुराव पवार सुनील पाटील प्रकाश चूनारकर राजेंद्र चौधरी संजय शेळके शांताराम घुले उमेश पाटील मराठवाडा विभागाचे अध्यक्ष संजय कोठाळे भगवान जायभाये विकास गवते अजित केंद्रे  यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  संजय निजापकर भरत मडके सुनील केने विलास बोबडे भिका सपकाळे रमेश गोहिल आबा बच्छाव प्रवीण ठुबे मंगेश जैवाळ श्रीराम बोचरे महादेव चाटे दत्तप्रसाद पांडागळे मच्छिंद्र गुरमे प्रशांत वाघमारे रमेश शिंगाडे प्रशांत महाजन  निळकंठ  गायकवाड आदींनी  कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत