मुख्यमंत्री 'मातोश्री'च्या पिंजऱ्यात कैद ; नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुख्यमंत्री 'मातोश्री'च्या पिंजऱ्यात कैद ; नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई: ' वेबटीम   गेल्या चार महिन्यांत राज्य १० वर्षे मागे गेले आहे. राज्याला आज मुख्यमंत्रीच नाही. ज्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद आहे...

मुंबई: ' वेबटीम
  गेल्या चार महिन्यांत राज्य १० वर्षे मागे गेले आहे. राज्याला आज मुख्यमंत्रीच नाही. ज्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद आहे, तो 'मातोश्री'च्या पिंजऱ्यात बसला आहे. ' मातोश्री 'पुरताच मुख्यमंत्री आहे. एकतर मुख्यमंत्री तिथून बाहेर येत नाहीत आणि बाहेर आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रीय सरकार सत्तेत राहणं राज्याच्या हिताचं नाही', अशा शब्दांत भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 'प्रहार' केला.
भाजप कार्यालयात नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नितेश राणे, राज पुरोहित उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मुख्यमंत्री ठाकरे होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत