अहमदनगर : वेबटीम राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातून आज दुपारी पाच जणांना नगर येथील पोलीस पथकाने तपासासाठी उचलल्याने गावात खळबळ उडाली...
अहमदनगर : वेबटीम
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातून आज दुपारी पाच जणांना नगर येथील पोलीस पथकाने तपासासाठी उचलल्याने गावात खळबळ उडाली आहे. याची समजलेली माहिती अशी की, आज वांबोरी परीसरात बाहेरच्या पोलिसांनी हजेरी लावत धरपकड सुरू केली. यात एका महिलेसह अन्य चार तरुण असे एकूण पाच जनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही वार्ता गावात पसरताच मोठी चर्चा सुरू झाली आहे, मात्र पोलिसानी या लोकांना नेमके कोणत्या गुन्ह्यात उचलले, याची माहिती समजू शकली नाही.दरम्यान, तालुक्यातील एका बड्या व्यापाऱ्याला काही दिवसांपासून एक टोळी ब्लॅक मेल करत होती, संबंधित व्यापाऱ्याच्या कुटुंबातील काही नाजूक क्लिप एका टोळीच्या हाती लागल्याची चर्चा होती, त्यातून त्या व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी सुरू होती, अशी चर्चा आहे, मात्र या सायबर गुन्ह्याशी व खंडणीशी आज ताब्यात घेतलेल्या लोकांचा काही संबंध आहे की नाही ? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र गावात त्या लोकांना उचलल्याने याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत