मुंबई : वेबटीम एकेकाळी शिवसेनेशी कोणत्याही परिस्थितीत युती नाही, नाही, नाही, म्हणजे नाहीच, अशी भीष्मप्रतिज्ञा केलेल्या भाजपला आता पुन्हा ...
मुंबई : वेबटीम
एकेकाळी शिवसेनेशी कोणत्याही परिस्थितीत युती नाही, नाही, नाही, म्हणजे नाहीच, अशी भीष्मप्रतिज्ञा केलेल्या भाजपला आता पुन्हा एकत्र संसाराचे डोहाळे लागले आहेत, म्हणूनच की काय आज भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटलांनी ' राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार' असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे.च्चंद्रकांत दादा ट्वीटरवर म्हणाले की,राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार, जरी एकत्र यायची वेळ आली, तरी निवडणुका मात्र एकत्र लढणार नाही, हे चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू असताना आज चंद्रकांत दादा पाटील यांनी टाकलेल्या या गुगलीने काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये कुजबुज सुरू झाली आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत