दिल्ली : वेबटीम प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी।काही ठराविकच लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या भूमीप...
दिल्ली : वेबटीम
प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी।काही ठराविकच लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या भूमीपूजनाला निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय . या भूमिकेमुळे पुन्हा एकदा पवार चर्चेत आले आहेत.सध्या देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. ते सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी बोलताना पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, राममंदिराच्या भूमीपूजनासाठी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाऊ नये यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते आग्रही असताना आता महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनीच आपली भूमिका स्पष्ट केल्याने उद्धवसाहेब अयोध्येला जाण्याचे धाडस दाखवतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत