12 वी निकाल उद्या ; या वेबसाईटवर दिसेल रिझल्ट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

12 वी निकाल उद्या ; या वेबसाईटवर दिसेल रिझल्ट

मुंबई : वेबटीम    अनेक दिवसांपासून वेध लागलेल्या 12 वी निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे.  इयत्ता 12 वी निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर ...

मुंबई : वेबटीम   
अनेक दिवसांपासून वेध लागलेल्या 12 वी निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे.  इयत्ता 12 वी निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहयाला येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर पहावे.

राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढत असतानाच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्ड 12 वी इयत्तेच्या परीक्षेच्या निकालांची घोषणा करण्याची तयारी करत आहे. इयत्ता 12 वी निकाल उद्या (16 जुलै) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. अशात परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांनी बोर्डाची ऑफिशियल वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर लेटेस्ट अपडेट चेक करत राहावे. कोणत्याही माहितीसाठी केवळ ऑफिशियल वेबसाइटवर विश्वास ठेवावा.
 महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी एज्युकेशनने 12 वी ची परीक्षा लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी घेतली होती.

महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट :

महाराष्ट्र बोर्ड दरवर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात 12वी (एचएससी) ची परीक्षा घेते. या वर्षी 13 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत