श्रीगोंदा : वेबटीम। मित्र म्हणजे सखा, सवंगडी, सोबती, जिवलग असे अनेक दाखले देता येतील, यात लंगोटी यार असलेल्या मित्रांची कहाणी काही ...
श्रीगोंदा : वेबटीम।
मित्र म्हणजे सखा, सवंगडी, सोबती, जिवलग असे अनेक दाखले देता येतील, यात लंगोटी यार असलेल्या मित्रांची कहाणी काही औरच. आता हेच पहा ना, तालुक्यातील टाकळी कडेवळीत मागील काही दिवसांपूर्वी आपल्या मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यामुळे एक चांगला मित्र हरपला, मात्र त्याचा विरह सहन न झाल्याने आपल्या त्या मित्राला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी या मित्रांनी अक्षरशः कबर खोदल्याने या अनोख्या यारानाची मोठी चर्चा सुरू आहे. याचं झालं असे की, गावातील दोन मद्यपी इसमाने गावातच गावठी दारू पिऊन झिंगाट झाल्यावर त्यांना त्याच्या मयत मित्र मिरसाब याची आठवण आणि दारूच्या नशेत त्यांना आपला मित्र पहावा वाटला आणि मग त्या दोघांनी एक लोखंडी पहार आणि एक फावडे उपलब्ध केले आणि गावातील वेशीच्या बाहेर मारूती मंदिराच्या पाठीमागे मुस्लीम कबरस्थान या ठिकाणी पोहचले आणि दारूच्या नशेत त्यांनी त्यांचा मयत मित्र मिरसाब याची कबर शोधली आणि पायाच्या बाजूने कबर उकरायला सुरुवात केली.
हे दोन बहाद्दर मयत मिरसाब याची कबर खोदण्यासाठी कबरस्थानमध्ये गेले असल्याची खबर वाऱ्यासारखी गावात पोहोचले आणि गावातील काही सज्ञान नागरिक मुस्लिम कबरस्थानमध्ये पोहचले आणि त्यांना कबर खोदण्यापासून विरोध करू लागले. त्यावेळी मद्यधुंद त्या लोकांनी नागरिकांना सांगितले आमचा मित्र आहे आणि आम्हाला त्यास पहायचे आहे. परंतू जास्त लोक जमा झाले आणि मद्यपी दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र ही खबर वाऱ्यासारखी गावात पसरली आणि याबाबत चर्चेला उधाण आले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत