आज गुरुवार दि 9 जुलै, वाचा काय म्हणतेय तुमची रास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज गुरुवार दि 9 जुलै, वाचा काय म्हणतेय तुमची रास

मेष : विद्यार्थ्यांना चांगला काळ. पत्रकार मंडळींना लाभ. महिला वर्ग खूष राहील. मिश्रित फलदायी दिवस. मुलांच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या ...

मेष : विद्यार्थ्यांना चांगला काळ. पत्रकार मंडळींना लाभ. महिला वर्ग खूष राहील. मिश्रित फलदायी दिवस. मुलांच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या वर्तणुकीने दुःखी व्हाल. मन खिन्न होईल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. जोडीदाराची कृती खटकण्याची शक्यता.
वृषभ : तर्कावरचे गणित चुकेल. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता. विश्वासघाताची शक्यता. गुंतवणूक लाभदायक ठरेल. एखाद्या गोष्टीचे मूल्यांकन करण्यासाठी उत्तम काळ. हुकुमी एक्का वापरावा लागेल.
मिथुन : मानसिक आनंदाचा काळ. प्रशंसा वाढेल. स्वत:ला बंधनात ठेवू नका. दिवसाची सुरुवात एकदम अनुकूल होईल. आर्थिक बाजू उत्तम राहील. एखाद्या गोष्टीचे दुहेरी अर्थ निघू शकतात. त्यामुळे अखंड सावधान असावे.

कर्क : देणी-घेणी मिटतील. आळसाचा दिवस. उद्योगाचा मार्ग धरावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. दिवसाची सुरुवात प्रतिकूल होण्याची शक्यता. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये.
सिंह : नवीन व्यवसायात भागीदार मिळेल. परस्पर वाद वा ताण नकोच. छंद जपावे. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा. कामावर लक्ष केंद्रीत केल्यास यशाचे मार्ग प्रशस्त होतील.
कन्या : तडकाफडकी घाईचे निर्णय नको. शेजारधर्म पाळा. वादात १०० टक्के जय मिळेल. गैरफायदा घेऊ देऊ नका. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरेल. लाभदायक घटना घडतील.

तुळ : प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. एखाद्या स्पर्धेसाठी तयार राहावे. व्यवसाय, व्यापार, उद्योगातील व्यवहार अत्यंत चोख ठेवा. नियोजित कामे वेळेवर पूर्ण केल्यास लाभ मिळू शकेल.

वृश्चिक : वेतनकपात होईल. कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक. पत्नीकडून लाभ. ठरवलेली कामे होतीलच असे नाही. फसवणूक होण्याची शक्यता. एकूणच दिवस मध्यम फलदायी जाईल. आनंदवार्ता मिळण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रलंबित येणी मिळण्याचे संकेत.  

धनु : मोठे व्यवहार करताना भागीदारी टाळावी. गैरसमज वा अफवांवर विश्वास नको. आनंदी काळ. परिस्थिती सुधारत जाईल. विनाकारण घोर लागून राहू शकतो. मन विचलित करणाऱ्या घटना घडतील.

मकर : नवीन धाडसासाठी पैसे जमवावे लागतील. मीटिंगला चांगला दिवस. कृती श्रेष्ठ राहील. अचूक माहिती मिळण्याचा दिवस. बौद्धिक क्षमता वाढीस लागेल. गणमान्य व्यक्तींशी ओळख होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आप्तेष्टांकडून आनंदवार्ता समजतील.
कुंभ : भाऊबंदांमधील वाद टाळा. पंक्तीप्रपंच नको. मैत्रीत वादाची शक्यता. नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस. काही घटना चिंता वाढवणाऱ्या ठरण्याची शक्यता. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.

मीन : घराचे व्यवहार मार्गी लागतील. वडीलबंधूंशी वाद होण्याची शक्यता. उपदेश करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. समस्या उद्भवतील. बहुतांश गोष्टी काळावर सोडणे हिताचे ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत