राहुरी ः वेबटीम मुलगी पाहिली, गालात हसली, पसंत झाली, दुसर्या दिवशी लग्न ठरलं, ती नटून थटून आली, चारचौघात लग्न झालं आणि तिसर्या दिवशी ...
राहुरी ः वेबटीम
गावातील चारचौघांना बोलाविण्यात आले. गुरुलाही निरोप धाडला. अचानक लग्न असल्याने सर्वच गोंधळून गेले होते. अशातच एका चारचाकी गाडीतून एक वकील म्हणून सांगणारी महिला आपल्यासमवेत नटून थटून ‘त्या’ नवरीला घेवून आली. त्यांच्यासमवेत अन्य दोन कलवरेही होते. वाहन चालकाने या चौघा वर्हाडींना सोडून हवा भरण्याचे निमित्त करून वाहनासह काढता पाय घेतला.
दरम्यान, लग्न लागलं, काही वकीलही या लग्नाला उपस्थित होते. अर्थात तशी नोटरी केल्याचेही कानावर पडते. असो, चारचौघात मात्र चांगल्यापद्धतीने लग्न झालं. मुलीला दागिणे चढविले, सर्वकाही व्यवस्थित पार पडलं. आता हवा भरण्यासाठी गेलेले वाहन सायंकाळी 6 वाजता पुन्हा आले. आता नवरीला घेवून माहेरी जाण्याची ‘त्या’ वकील महिलेला आणि तिच्यासोबतच्या दोन तरूण कलावरेंना घाई झाली. परंतु नवरदेवाकडील लोकांनी रातोरात थांबविण्याची विनंती केल्यानंतर हे मंडळी थांबले. दुसर्या दिवशी सकाळी चहा नाष्टा घेवून नवी नवरी माहेरी जाण्यासाठी निघाली. या चौघांसोबत ती पुण्याला माहेरी चालल्याचे सांगून 5 जुनला गेली ते पुन्हा आलीच नाही.
त्यानंतर, नवरदेवासह कुटूंबाने त्या मुलीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या मध्यस्थी वकीलीनबाईलाही कॉन्टॅक्ट केले मात्र सर्वच नंबर स्वीच ऑफ लागत असल्याने आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी नवरदेवासह अन्य लोकांनी राहुरी पोलिस ठाणे गाठले. तेथे आपली कैफियत सांगून आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली.
मुलगी पाहिली, गालात हसली, पसंत झाली, दुसर्या दिवशी लग्न ठरलं, ती नटून थटून आली, चारचौघात लग्न झालं आणि तिसर्या दिवशी ती सोनं-नाणं घेवून पळूनही गेली. अशी एका लग्नाची अधुरी कहाणी कुठं सिनेमात घडली नाही, तर ती राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात घडल्याने याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.याचं झालं असं की, सध्या मुलींची संख्या कमी असल्याने ‘गुडघ्याला बाशिंग बांधून अनेकजण आपल्यासाठी वधुची शोधाशोध करत आहेत. ब्राम्हणीतही अशाच एका तरुणाला लग्नाची मोठी घाई. त्यासाठी वधुची शोधा शोध सुरू झाली. मुलगा गडगजं संपत्तीवाला असल्याने कुणीतरी लगेचच मुलीचे स्थळ सुचविले, मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम ठरला. पण, मुलगी गरीब घरातली, त्यामुळे तिचं घरही पडलेलं असल्याचे कारण देवून ‘त्या’ मध्यस्थीने मुलीला दाखविण्याचा कार्यक्रम श्रीरामपुरमधील एक हॉटेलमध्ये ठरविला. नवरदेवानेही त्याला तत्काळ होकार दिला. ठरल्याप्रमाणे श्रीरामपुरातील हॉटेलमध्ये मुलगी पाहिली, तीने गाळावर खळी आणताच मुलानेही ती पसंद असल्याचे सांगून टाकले. मग, पुढे लग्नाचे नियोजन सुरू झाले. मुलीची परिस्थिती हलाकीची असल्याने तिच्या कुटूंबाला सव्वा दोन लाख रुपये रोख देण्याचे ठरले. तसेच मुलीला लग्नात दोन तोळे सोन्याचे नेकलेस करण्यावर शिक्कामोर्तब झाले. नवरदेवाकडील लोकांनी तत्काळ ही तजवीज केली. ठरल्याप्रमाणे लगेचच मध्यस्थीमार्फत पैसे जमा केले आणि दुसर्या दिवशी म्हणजेचं 4 जुन रोजी ब्राम्हणीत हे लग्नही ठरलं.
गावातील चारचौघांना बोलाविण्यात आले. गुरुलाही निरोप धाडला. अचानक लग्न असल्याने सर्वच गोंधळून गेले होते. अशातच एका चारचाकी गाडीतून एक वकील म्हणून सांगणारी महिला आपल्यासमवेत नटून थटून ‘त्या’ नवरीला घेवून आली. त्यांच्यासमवेत अन्य दोन कलवरेही होते. वाहन चालकाने या चौघा वर्हाडींना सोडून हवा भरण्याचे निमित्त करून वाहनासह काढता पाय घेतला.
दरम्यान, लग्न लागलं, काही वकीलही या लग्नाला उपस्थित होते. अर्थात तशी नोटरी केल्याचेही कानावर पडते. असो, चारचौघात मात्र चांगल्यापद्धतीने लग्न झालं. मुलीला दागिणे चढविले, सर्वकाही व्यवस्थित पार पडलं. आता हवा भरण्यासाठी गेलेले वाहन सायंकाळी 6 वाजता पुन्हा आले. आता नवरीला घेवून माहेरी जाण्याची ‘त्या’ वकील महिलेला आणि तिच्यासोबतच्या दोन तरूण कलावरेंना घाई झाली. परंतु नवरदेवाकडील लोकांनी रातोरात थांबविण्याची विनंती केल्यानंतर हे मंडळी थांबले. दुसर्या दिवशी सकाळी चहा नाष्टा घेवून नवी नवरी माहेरी जाण्यासाठी निघाली. या चौघांसोबत ती पुण्याला माहेरी चालल्याचे सांगून 5 जुनला गेली ते पुन्हा आलीच नाही.
त्यानंतर, नवरदेवासह कुटूंबाने त्या मुलीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या मध्यस्थी वकीलीनबाईलाही कॉन्टॅक्ट केले मात्र सर्वच नंबर स्वीच ऑफ लागत असल्याने आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी नवरदेवासह अन्य लोकांनी राहुरी पोलिस ठाणे गाठले. तेथे आपली कैफियत सांगून आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत