बनावट सोन्यावर कर्ज लाटलं ; सोनारासह 24 जणांवर गुन्हा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बनावट सोन्यावर कर्ज लाटलं ; सोनारासह 24 जणांवर गुन्हा

अहमदनगर ः वेबटीम    बँकेत सोने तारण पद्धतीने कर्ज दिले जात असताना बँकेत सोने मोजणारा व्हॅल्यूअर अर्थात सराफाच्या संगनमताने खोटे सोने बँक...

अहमदनगर ः वेबटीम   
बँकेत सोने तारण पद्धतीने कर्ज दिले जात असताना बँकेत सोने मोजणारा व्हॅल्यूअर अर्थात सराफाच्या संगनमताने खोटे सोने बँकेत ठेवून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी काल रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित बँकेच्या गोल्ड व्हॅल्युअरसह २४ जणांच्या विरोधात ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     
नगरच्या सावेडी उपनगरात जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या बँकेची शाखा आहे. या बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर म्हणून लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर हा काम पाहत होता. सोने तारण कर्जासाठी सोन्याचे दागिने घेऊन एखादी व्यक्ती आल्यानंतर संबंधित दागिने तपासून त्याची व्हॅल्यू काढून देत असे. तसे प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला देण्याचे काम गोल्ड व्हॅल्युअर म्हणून तो करीत होता. मात्र, देडगावकरनं तब्बल २३ जणांना त्यांनी आणलेले धातुचे दागिने खरे सोन्याचे आहेत, अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले. संबंधित २३ जणांनी या बनावट प्रमाणपत्राच्या वापर करून बनावट दागिन्यांवर बँकेमध्ये वेगवेगळी ३८ सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बँकेकडून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर याच्यासह इतर २३ जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मिलिंद मधूकर आळंदे यांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत