मंदिर जिर्णोद्धारास 1 लाख 75 हजार देईल, तो प्रशासक..! ; 'या' गावाने घेतला निर्णय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंदिर जिर्णोद्धारास 1 लाख 75 हजार देईल, तो प्रशासक..! ; 'या' गावाने घेतला निर्णय

मुंबई : वेबटीम  राज्यात पालकमंत्री ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करत असताना एका गावाने मात्र ही निवड स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे,...

मुंबई : वेबटीम 
राज्यात पालकमंत्री ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करत असताना एका गावाने मात्र ही निवड स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे, जो ग्रामदैवत मंदिरासाठी 1 लाख 75 हजार देईल, तो आमचा प्रशासक असेल, अशी भूमिका या गावाने घेतली आहे.    
  मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदासाठी पालकमंत्र्यांनी नाव सुचविण्याचे आदेश निघाले असले तरी लातूरच्या कोळनर गावात मात्र जनतेने बैठक घेवून आमचा प्रशासक आम्हीच ठरविणार असा असा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी अटी व नियम देखील ग्रामस्थांनी एकत्र येत पंच कमेटीला दिले आहेत. त्यानुसार या पदासाठी बोली लावण्याचा निर्णय झाला.  त्यामध्ये गावातील ग्रामदैवत खंडोबा मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी जो व्यक्ती 1 लाख 75 हजार रुपये देईल, त्याला प्रशासक पद देण्याचा निर्णय झाला. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशापलिकडे जावून आमचा प्रशासक आम्ही ठरविणार ही भूमिका गावाने घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत