राहुरी ः वेबटीम वांबोरी येथे कोरोनााधित आढळलेल्या ‘त्या’ खासगी डॉक्टरने उपचार केलेल्या ‘35’ रुग्णांचा प्रशासन शोध घेत असतानाच आता आणख...
राहुरी ः वेबटीम
या डॉक्टरने आपल्या नात्यातील विद्यार्थी 12 वी परीक्षेत पास झाल्याने त्या आानंदाच्या भरता अनेक जणांना पेढे भरवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांनी कुणाकुणाला पेढे भरवले व ते कुणी कुणी आनंदाने खाल्ले ? याचीच गावात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, एका कोरोनाबाधित रुग्णाने आपल्याला मुलगा झाल्याच्या आनंदात गावभर पेढे वाटले होते, मात्र त्याचा अहवाल बाधित आल्यानंतर संपूर्ण गावाला कॉरन्टाईन करावे लागले होते, ही बातमी मध्यंतरी वाचायला मिळाली होती. त्यानंतर आता वांबोरीतही ‘पेढे’ भोवल्याची चर्चा आहे.
वांबोरी येथे कोरोनााधित आढळलेल्या ‘त्या’ खासगी डॉक्टरने उपचार केलेल्या ‘35’ रुग्णांचा प्रशासन शोध घेत असतानाच आता आणखी एक चक्रावून सोडणारी वार्ता समोर आली आहे. संबधित डॉक्टरने आपल्या नात्यातील विद्यार्थी 12 वी पास झाल्याने अनेकांना पेढेही भरले होते. त्यामुळे हे पेढे खाणार्यांचेही धाबे दणाणले असून आता प्रसंगी पेढे खाणार्यांचाही शोध घ्यावा लागणार आहे.वांबोरी परिसरातील एक खासगी डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्या डॉक्टरकडे उपचार घेणार्यांचा शोध सुरू आहे. कारण या डॉक्टरलाही कात्रड शिवारातील कोरोना बाधित रुग्णावर उपचार केल्याने लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या डॉक्टरने कुणाकुणावर उपचार केले याची माहिती घेतली जात आहे. त्यात साधरणतः 30 ते 35 रुग्णांची नावे समोर आली असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या डॉक्टरने आपल्या नात्यातील विद्यार्थी 12 वी परीक्षेत पास झाल्याने त्या आानंदाच्या भरता अनेक जणांना पेढे भरवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांनी कुणाकुणाला पेढे भरवले व ते कुणी कुणी आनंदाने खाल्ले ? याचीच गावात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, एका कोरोनाबाधित रुग्णाने आपल्याला मुलगा झाल्याच्या आनंदात गावभर पेढे वाटले होते, मात्र त्याचा अहवाल बाधित आल्यानंतर संपूर्ण गावाला कॉरन्टाईन करावे लागले होते, ही बातमी मध्यंतरी वाचायला मिळाली होती. त्यानंतर आता वांबोरीतही ‘पेढे’ भोवल्याची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत