मुंबई : वेबटीम काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दर...
मुंबई : वेबटीम
राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे.
अधिकाऱ्यांनी त्या त्या खात्यातील मंत्र्यांना गृहित धरुन, परस्पर प्रस्ताव तयार करणे चुकीचे आहे. असे प्रस्ताव सर्वात आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र तसं न झाल्याने अशोक चव्हाण नाराज होणं साहजिक आहे.
काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने या नाराजीनाट्यवरपडदा पडला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या चारही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या चर्चेतून अखेर अशोक चव्हाण यांचे मतभेद दूर करण्यात महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांना यश आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज होते. याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून ‘वर्षा’ बंगल्यावर अशोक चव्हाण यांचे मतभेद दूर करण्यात आले
राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे.
अधिकाऱ्यांनी त्या त्या खात्यातील मंत्र्यांना गृहित धरुन, परस्पर प्रस्ताव तयार करणे चुकीचे आहे. असे प्रस्ताव सर्वात आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र तसं न झाल्याने अशोक चव्हाण नाराज होणं साहजिक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत