नेवासा : वेबटीम जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आज सोनईत कोरोना बाधित डॉक्टरचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे, दरम्यान, काल ...
नेवासा : वेबटीम जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आज सोनईत कोरोना बाधित डॉक्टरचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे, दरम्यान, काल मंत्री गडाख यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता गडाख यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली. म्त्यानंतर लक्ष लागलेल्या मंत्री गडाख यांचा स्वब अहवाल आला असून ते निगेटिव्ह आल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.दरम्यान, पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गडाख यांनी तपासणी करून घेतली होती. रात्री उशिरा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत