काय निघाले कांद्याचे आजचे भाव ; वाचा खाली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काय निघाले कांद्याचे आजचे भाव ; वाचा खाली

राहुरी : वेबटीम  राहुरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज  शुक्रवार  दि. 17 रोजी एकुण 42,978 गोणी कांद्याची आवक झाली. त्यात बाजारभा...

राहुरी : वेबटीम 
राहुरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज  शुक्रवार  दि. 17 रोजी एकुण 42,978 गोणी कांद्याची आवक झाली. त्यात बाजारभाव मात्र अपेक्षित न वाढल्याने कांदा उत्पादकांची पुन्हा निराशा झाली.  डोक्यावर नैसर्गिक संकट आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून होणारी लूट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

  आजचे  बाजारभाव खालील प्रमाणे

कांदा  नं.1 –  785  ते    900
कांदा  नं.2 –  525  ते    780
कांदा  नं.3 –  100  ते    520
गोल्टी        –  600  ते    800

 😃 *बाजारभाव व गोणी*

रु. 801 ते   900 :-    6916 गोणी
रु. 701 ते   800 :- 13792 गोणी
रु. 601 ते   700 :-   7642 गोणी
रु. 501 ते   600 :-   3189 गोणी
रु. 401 ते   500 :-   3382 गोणी
रु. 301 ते   400 :-   2412 गोणी
रु. 201 ते   300 :-   2414 गोणी
रु. 101 ते   200 :-   2865 गोणी

*😇अपवादात्मक गोण्यांचे भाव*

रु. 1000 :- 16 गोणी
रु.   960 :- 25 गोणी
रु.   950 :- 22 गोणी
रु.   940 :- 13 गोणी
रु.   930 :- 54 गोणी
रु.   925 :- 89 गोणी
रु.   920 :- 34 गोणी
रु.   915 :- 16 गोणी
रु.   910 :- 61 गोणी
रु.   905 :- 36 गोणी

*कांदा लिलावाचे वार*
*राहुरी* :- मंगळवार, शुक्रवार.

🌱 *www.msamb.com* 🌱 या पणन मंडळाच्या संकेतस्थळावरती इतर सर्व शेतीमालाचे बाजार भाव उपलब्ध आहेत. अवश्य भेट द्या.

*🗣️ कांदा उत्पादक शेतकरी बंधूंसाठी जाहीर निवेदन🙏🏻*

➡️ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा राहुरी बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणतांना बाजार समितीकडे अथवा संबंधीत कांदा आडत्याकडे *नोंद करण्याची आवश्यकता नाही.*

➡️ शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची *आवक ही कांदा मोंढ्याच्या 1 दिवस अगोदर  सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत बाजार समिती आवारात आणायची आहे.* 5 वाजेनंतर हमाल व तोलणार हे उपस्थित नसल्याने बाजार आवारात आलेली आवक उतरवून घेतली जाणार नाही अथवा कांदा घेऊन आलेल्या वाहनाला बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
*उदा:-*
1) शुक्रवारच्या मोंढ्यासाठी- गुरुवारी
2) मंगळवारच्या मोंढ्यासाठी- सोमवारी

*कांदा मोंढ्याच्या दिवशी गोण्या उतरून घेणारे हमाल व तोलणार हे गैरहजर असणार असल्याने आलेली आवक उतरवून घेतली जाणार नाही अथवा कांदा घेऊन आलेल्या वाहनाला बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे कृपया शेतकरी बंधूंनी मोंढ्याच्या दिवशी कांदा आवक मार्केटला आणू नये ही विनंती.* 🙏🏻


                  सचिव
कृषि उत्पन्न बाजार समिती, राहुरी

   🌳🙏 *धन्यवाद* 🙏🌳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत