अहमदनगर ः वेबटीम लोकसभा निवडणुकीपासून एकमेकांचे कट्टर विरोध समजले जाणारे खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप हे आज एकास व्या...
अहमदनगर ः वेबटीम
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी केली. या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर विखे हे खासदार होऊन दिल्लीत गेले, तर त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगरच्या विधानसभा मतदार संघातून संग्राम जगताप निवडून येऊन आमदार झाले.
नगरमधील बहुप्रतिक्षित असा उड्डाणपुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. उड्डाणपुलासाठी लष्कराच्या वर्किंग ऑर्डरचा देखील प्रश्न सुटला आहे . याबाबतची माहिती देण्यासाठी आज खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेसाठी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना बोलावले. त्यांनीही या पत्रकार परिषदेला हजेरी लावत नगरच्या विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच सहकार्य असल्याचा संदेश दिला.
लोकसभा निवडणुकीपासून एकमेकांचे कट्टर विरोध समजले जाणारे खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप हे आज एकास व्यासपीठावर एकमेकांसोबत गुलगुुुलू गप्पा मारताना पाहून कार्यकर्ते चक्रावून गेले. यावेळी सामान्य जनतेनेही बदलत्या वेळेनुसार बदलणारा राजकीय रंग पाहून तोंडात बोटं घातली. .मागील लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व संग्राम जगताप हे आज एकाच पत्रकार परिषदेमध्ये एकत्र आले. अर्थात नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा उड्डाणपूल व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी केली. या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर विखे हे खासदार होऊन दिल्लीत गेले, तर त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगरच्या विधानसभा मतदार संघातून संग्राम जगताप निवडून येऊन आमदार झाले.
नगरमधील बहुप्रतिक्षित असा उड्डाणपुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. उड्डाणपुलासाठी लष्कराच्या वर्किंग ऑर्डरचा देखील प्रश्न सुटला आहे . याबाबतची माहिती देण्यासाठी आज खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेसाठी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना बोलावले. त्यांनीही या पत्रकार परिषदेला हजेरी लावत नगरच्या विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच सहकार्य असल्याचा संदेश दिला.
लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार टिका करणारे व त्यानंतर विधानसभेतही आगपाखड करणारे नव्हे नव्हे तर घाटावर आणि घाटाखाली जावू व येवू न देण्याची भाषा करणारे हे दोन नेते आज एकत्र प ाहून आचंबित झाले. म ात्र, लोकसभा निवडणुकीत जगताप यांच्या नादाला लागून विखेंशी पंगा घेणारे तसेच विखेंच्या शब्दावर जगताप यांच्याशी वैर घेणारे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपण निवडणुक काळात केलेली तोडफोड, मोडतोड, दादागिरी व आपापसात केलेले वैर निरर्थक असल्याचे आता बोलत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत