दिल्ली ः वेबटीम मध्य प्रदेशातील madhya pradesh रतलाम Ratlam Murder जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरीची गळा चिरून हत्या ( Bride Murder ) ...
दिल्ली ः वेबटीम
मध्य प्रदेशातील madhya pradesh रतलाम Ratlam Murder जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरीची गळा चिरून हत्या ( Bride Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरीची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. मृत तरुणी शाजापूर जिल्ह्यातील नाग-नागिण रोड येथे राहणारी होती. लग्नासाठी तरुणी शाजापूर येथून रविवारी पहाटे पाच वाजता निघाली होती. तेथे पोहोचल्यानंतर ती नऊ वाजता ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेली होती.
ब्युटी पार्लरमध्ये तरुणी मेकअप करण्यासाठी गेली त्यावेळी एक तरूण अचानक पार्लरमध्ये घुसला. त्याच्या हातात चाकू होता. आतमध्ये मेकअप करत असलेल्या तरुणीचा त्याने चाकूनं गळा चिरला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या तरुणानं ब्युटी पार्लरमध्ये घुसून तरुणीची हत्या कशी केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेची वार्ता शाजापूरमध्ये पसरल्यानंतर गावावर शोककळा पसरली.
तिचं दुसरं लग्न होतं...
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचं हे दुसरं लग्न होतं. नवरा-बायकोत भांडणं होऊ लागल्यानंतर घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिचं हे दुसरं लग्न होतं. या तरुणीची हत्या झाल्याची माहिती समजल्यानंतर कुटुंबीय जावरा येथे निघाले. जावरा पोलिसांनी आता शाजापूर पोलिसांशी संपर्क साधला आहे. मृत तरुणीच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. हत्या करणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जावरा पोलीस अधिकारी सी. एस. पी. राणावत हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृत तरुणी आणि तिचे कुटुंब शाजापूर येथील रहिवासी आहेत. रविवारी पहाटेच ते जावरा येथे आले होते. नवरामुलगा नागदा येथील रहिवासी आहे. नवरीमुलगी सोनू ही बहिणीसोबत ब्युटी पार्लरमध्ये आली होती. तेव्हा एक तरूण चाकू घेऊन पार्लरमध्ये घुसला. त्यानं चाकूनं गळा कापला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अशी माहिती प्राथमिक चौकशीनंतर समोर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत