मुंबई ः वेबटीम राज्यातील ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासक निवडण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आंदो...
राज्यातील ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासक निवडण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर याची तत्काळ दखल घेण्यात आली असून, आण्णांच्या पत्राला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘घटनेतील तरतुदी, न्यायालयाचे आदेश आणि सध्याची बिकट परिस्थिती अशावेळी गावगाडा सुरळीत चालण्यासाठी छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला,’ असा खुलासा पत्रात करण्यात आला आहे. याना समक्ष भेटण्याची इच्छाही मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे राज्यातील मुदत संपलेल्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे. त्यात दुरुस्ती करणारे एक परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करावी, असे त्यात म्हटले आहे. यात पालकमंत्र्याचा सल्ला घेण्यास हजारे यांची हरकत आहे. यामुळे नियुक्त्यांना राजकीय स्वरूप येऊन घोडेबाजारही होऊ शकतो अशी शंका व्यक्त करून हजारे यांनी परिपत्रक मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट आंदोलनाचा इशारा दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत