संगमनेर ः वेबटीम गेल्या काही दिवसांपासून दूध धंद्याचे वाटोळे झाले आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढत असताना दुसरीकडे दुधाचे दर मात्र कमालीचे क...
गेल्या काही दिवसांपासून दूध धंद्याचे वाटोळे झाले आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढत असताना दुसरीकडे दुधाचे दर मात्र कमालीचे कोसळले आहेत. त्यामुळे सरकारने या दुध उत्पादकांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी आज आंदोलने झाले.
संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला महाविकास आघा डीच्या सरकारने कमीत कमी 30 ते 35 रुपये प्रतिलिटर हमीभाव द्यावाया मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध दूध संस्थांवर जाऊन दुधाला हमीभाव न देणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा निषेध असो शेतकरी एकजुटीचा विजय असो आम च्या कष्टाचे दाम मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भगतसिंग दूध संस्थ आणि जोर्वे येथील अमृत दूध संस्थेचा परिसर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दणाणून टाकला. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने लवकरात लवकर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला 35 रुपये हमी भाव दिला नाही तर आम्ही संगमनेर तालुक्या मध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भास्कर दिघे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संतोष रोहम यांनी देत दुधाला हमी भाव न देणाऱ्या महाविकास आघाडी
सरकारच्या निर्णयाचा निषेध केला


कोणत्याही टिप्पण्या नाहीत