मुंबई : वेबटीम चिनी मालाच्या वापरासंदर्भात सर्वत्र दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. चिनी माल वापरणे, चिनी अॅप वापरणे याचबरोबर चिनी वस्तूंची...
मुंबई : वेबटीम
इकोरॅपच्या निरीक्षणानुसार, केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यामुळे देशातील आयटी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या क्षेत्राला स्वतःच्या क्षमता विकसित करण्यास यामुळे मोठा वाव मिळणार आहे.
कमी किंमतीची औद्योगिक उत्पादने, मोठ्या किंमतीची यंत्रसामग्री व इलेक्ट्रिक उपकरणे यांची आयात मोठ्या प्रमाणावर चीनमधून केली जात आहे. या सर्व वस्तूंमध्ये भारतीय उत्पादक चीनशी समर्थपणे स्पर्धा करू शकतात. सध्या दूरसंचार, कम्प्युटर, माहिती सेवा यांची मोठ्या प्रामणात जगभरात भारतातून निर्यात केली जात आहे. तरीही चीन बारताची बरोबरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. चीनचे हे प्रयत्न वेळीच ओळखून त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी भारताने आयात होणाऱ्या काही उत्पादनांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
चिनी मालाच्या वापरासंदर्भात सर्वत्र दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. चिनी माल वापरणे, चिनी अॅप वापरणे याचबरोबर चिनी वस्तूंची आयात थांबवणे यासारखे निर्णय घेतले जात आहेत. मात्र चिनी आयात एकदम न थांबवता, टप्प्याटप्प्याने थांबवावी, असे मत 'एसबीआय'च्या इकोरॅप या अहवालात बुधवारी व्यक्त करण्यात आले.
इकोरॅपच्या निरीक्षणानुसार, केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यामुळे देशातील आयटी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या क्षेत्राला स्वतःच्या क्षमता विकसित करण्यास यामुळे मोठा वाव मिळणार आहे.
कमी किंमतीची औद्योगिक उत्पादने, मोठ्या किंमतीची यंत्रसामग्री व इलेक्ट्रिक उपकरणे यांची आयात मोठ्या प्रमाणावर चीनमधून केली जात आहे. या सर्व वस्तूंमध्ये भारतीय उत्पादक चीनशी समर्थपणे स्पर्धा करू शकतात. सध्या दूरसंचार, कम्प्युटर, माहिती सेवा यांची मोठ्या प्रामणात जगभरात भारतातून निर्यात केली जात आहे. तरीही चीन बारताची बरोबरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. चीनचे हे प्रयत्न वेळीच ओळखून त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी भारताने आयात होणाऱ्या काही उत्पादनांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत