म्हणून नवरा बायकोने घेतले विष ; वाचा पुढे काय घडलं - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

म्हणून नवरा बायकोने घेतले विष ; वाचा पुढे काय घडलं

पुणे ः वेबटीम    सध्याच्या कोरोना संकटामुळे प्रशासनाने अनेक भागात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. अशाच एका  प्रतिबंधित क्षेत्रात प्रव...

पुणे ः वेबटीम   
सध्याच्या कोरोना संकटामुळे प्रशासनाने अनेक भागात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. अशाच एका  प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश नाकारल्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या एक दाम्पत्याने विषप्राशन करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावात घडलेल्या या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पती अत्यवस्थ आहे.

तपासणी नाक्यावर आईवडिलांना मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलल्याची तक्रार त्यांच्या मुलाने केली आहे. रोहिदास कुशाबा शिंगोटे (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी अनुजा रोहिदास शिंगोटे (वय ४०, रा. उंब्रज नं. १, ता. जुन्नर) असे दाम्पत्याचे नाव आहे. अनुजा यांचा मृत्यू झाला असून, रोहिदास यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळब‌ळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत