‘राजेंना’ खालच्या रांगेत स्थान ; बैठकीत झाला राडा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

‘राजेंना’ खालच्या रांगेत स्थान ; बैठकीत झाला राडा

मुंबई ः वेबटीम     मराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत छत्र...

मुंबई ः वेबटीम   
 मराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे भोसले यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्यानं  आज वेगळाच राडा पाहायला मिळाला.  
 महाविकास आघाडी सरकारनं 'सारथी' संस्थेकडं दुर्लक्ष केलं असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. सरकारकडून याबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतरही हे आरोप सुरूच होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा त्रागा संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठक बोलावली होती. संभाजीराजेंनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
पूर्वनियोजित वेळेनुसार मंत्रालयात ही बैठक सुरू झाली. पहिली बैठक ही सर्व प्रतिनिधींसोबत होणार होती. अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार हे देखील बैठकीला उपस्थित होते. मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच आसन व्यवस्थेवरून गोंधळ सुरू झाला. व्यासपीठावर अजित पवार, विजय वडेट्टीवार व नवाब मलिक हे बसले होते. तर, संभाजीराजे हे तिसऱ्या रांगेत बसले होते. त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत