भंडारदरा, निळवंडे व मुळाचा किती झाला पाणीसाठा ; वाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भंडारदरा, निळवंडे व मुळाचा किती झाला पाणीसाठा ; वाचा

राहुरी ः वेबटीम  जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागलेल्या धरणातील पाणी साठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. काल भंडारदरा धरण 35 टक्के, निळ...

राहुरी ः वेबटीम 
जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागलेल्या धरणातील पाणी साठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. काल भंडारदरा धरण 35 टक्के, निळवंडे 50 टक्के तर मुळा धरण 30 टक्के भरल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून समजली आहे. 
उत्तर जिल्ह्याला वरदान असलेल्या भंडारदरा धरणात वाकी तलाव भरल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे धरणात 3700 दलघफूृ पाणीसाठा झाला आहे. तर त्याखालील निळवंडे धरणात  आवक वाढून 8 हजार 400 दलघफू इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय नगर दक्षिण जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातही नवीन पाणी सुरू झाले आहे. मात्र, पाणलोटात पाऊन वाढलेला नसला तरी आवक मात्र सुरू आहे. काल सायंकाळी धरणात मुळा पात्राव्दारे 1 हजार 253 क्यूसेक पाणी येत होते. तर धरणाचा पाणीसाठा 8300 इतका झाला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत